Horoscope Today 11 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 11 मे 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीखंडोबाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आज नोकरी- धंद्यामधील पार्टनरशी मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्या
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज मानाने पैसा मिळवा, सामाजिक कार्यातील व्यक्ती सामाजिक गोष्टी पुढाकार घेतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज मुलांना योग्य संधी मिळतील, आपली पत प्रतिष्ठा वाढण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न कराल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज जेवढा सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल, तेवढे परस्पर संबंध सुधारतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज व्यवसायात कामाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल, महिला आवडत्या गोष्टीसाठी वेळ काढतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज हाताखालच्या लोकांवर विश्वास टाकावा लागेल, प्रेम प्रकरणांमध्ये आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज व्यवसायात संधीचे सोने करणे तुमच्याच हातात राहील, नवीन ओळखी होतील, पण अतिविचारामुळे स्वतःचे नुकसान करून घ्याल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आवश्यक त्यांना सहकार्याचा हात द्याल, नावलौकिक वाढेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज बौद्धिक कामे करण्यात दिवस जाईल, प्रसिद्धी मिळेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज लेखकांना लिखाणात प्रगती करता येईल, करिअरमध्ये विचारांना स्थिरता दिली तर यश मिळवू शकाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज थोडासा आळशीपणा आणि लवकर निर्णय न घेतल्यामुळे नुकसान संभवते
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज उत्तम संधी मिळण्यासाठी कष्टाला पर्याय नाही, एखाद्या कामासाठी विलंब अडथळे यांचा सामना करावा लागेल
हेही वाचा:
Navpancham Rajyog 2025: याला म्हणतात नशीब! 22 मे पासून 'या' 3 राशी होणार टेन्शन फ्री, चंद्र-गुरुचा जबरदस्त नवपंचम राजयोग, बक्कळ पैसा हाती असेल
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)