Navpancham Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार 2025 हे वर्ष अनेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यात ग्रहांची युती आणि संयोगाला विशेष महत्त्व आहे. यातील एक महत्त्वाचा योग म्हणजे नवपंचम योग, जो गुरु आणि चंद्राच्या युतीने तयार होतो. हा योग अत्यंत शुभ मानला जातो कारण गुरु ग्रह ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक आहे, तर चंद्र मन आणि भावनांचे प्रतिनिधित्व करतो. या संयोगामुळे मानसिक शांती, आर्थिक प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार, 22 मे पासून 3 राशी टेन्शन फ्री होणार आहेत. कारण या दिवशी चंद्र-गुरुचा जबरदस्त नवपंचम राजयोग बनतोय. भाग्यशाली राशी जाणून घ्या..

सर्वात शक्तिशाली आणि शुभ योगांपैकी एक ...

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्वात शक्तिशाली आणि शुभ योगांपैकी एक म्हणजे नवपंचम योग. जेव्हा एखाद्याच्या जन्मकुंडलीत नवव्या किंवा पाचव्या घरात एखादा ग्रह असतो तेव्हा नवपंचम योग तयार होतो. नवव्या आणि पाचव्या घरांना त्रिकोणी घरे देखील म्हणतात जे खूप शुभ मानले जातात. 22 मे, गुरुवार रोजी चंद्र आणि गुरु ग्रहाद्वारे नवपंचम राजयोगाची निर्मिती होत आहे. वैदिक पंचांगानुसार, चंद्र 22 मे, गुरुवारी दुपारी 12:08 वाजता मीन राशीत भ्रमण करेल. तर, गुरु ग्रह मिथुन राशीत असेल. अशा परिस्थितीत दोन्ही ग्रह नवपंचम योग तयार करतील.  काही राशीच्या लोकांना नोकरीपासून ते व्यवसायापर्यंतच्या बाबतीत फक्त फायदे मिळणार आहेत. नवपंचम राजयोग कोणत्या ३ राशींसाठी फायदेशीर ठरेल ते जाणून घेऊया..

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्र आणि गुरु ग्रहामुळे निर्माण होणारा नवपंचम राजयोग शुभ राहील. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत यश मिळवू शकाल. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. समाजात आदर आणि सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. तुम्ही आयुष्यातील सततच्या ताणतणावापासून दूर राहाल. तुम्ही मित्रांना भेटू शकता आणि तुमचे मन आनंदी होईल.

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी वेळ चांगला राहील. जीवनात सकारात्मक बदल होतील. तुम्ही अनावश्यक वादांपासून दूर राहाल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे आणि त्यांना यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. ज्या कामाची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता ते काम पूर्ण होईल. तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता.

मीन

ज्योतिषशास्त्रानुसार, तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. मानसिक शांती मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. तुम्ही आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत वेळ चांगला जाईल.

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiac Sign: 'मे' चा नवा आठवडा मेषसह 'या' 5 राशींसाठी अद्भूत! शुभ योगांनी चमकेल नशीब, श्रीमंतीचे संकेत, साप्ताहिक भाग्यशाली राशी  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)