एक्स्प्लोर

Horoscope Today 10 June 2026 : आज बुधवारचा दिवस 6 राशींसाठी ठरणार भाग्यशाली; दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10 June 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 10 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 10 जून 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार बुधवार आहे. हा दिवस आपण गणरायाला समर्पित करतो. त्यानुसार, आज गणपतीची पूजा करतात. उपवास धरतात आणि इच्छित फळ मागतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुम्हाला दिवसाच्या शेवटी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरी-व्यवसायात तुम्हाला जोडीदाराची साथ लाभेल. कामाच्या ठिकाणी देखील प्रसन्न वातावरण असणार आहे.  तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

तुमच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास , तुम्हाला आज थोडं अस्वस्थ वाटेल. तुमच्या रिलेशनशिपची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. मात्र, तुमचं मन फार भावूक आहे. या कालावधीत घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसायाचा विस्तार छान वाढलेला दिसेल. प्रगतीचे संकेत आहेत. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठीसुद्धा आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुमच्या मान-सन्मानाला आज ठेच लागण्याची दाट शक्यता आहे. प्रवास करताना तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी होताना विशेष विधी करावी लागेल. झोप पूर्ण न झाल्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात फार नकारात्मक होईल. तुमच्या मनाविरुद्ध काम झाल्यामुळे तुम्हाला फार निराश वाटेल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. मात्र, त्यात तुम्हाला मनासारखा लाभ मिळणार नाही. आजच्या दिवसात निळ्या वस्तूचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. आज काही कारणास्तव तुमचं मन फार नाराज होऊ शकतं. तुमच्या भूतकाळातील आठवणी आज ताज्या होतील. नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असेल. काही विशेष घडणार नाही.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सतर्कतेचा असणार आहे. तुमचे शत्रू तुमच्या वाईटावर आहेत या गोष्टीची जाणीव तुम्हाला सतत जाणवेल. त्यामुळे तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहा. त्यामध्ये जराही दिरंगाई करु नका. प्रेम जीवन देखील सामान्य राहील.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स येत असल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. मेहनतीचं फळ मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी देखील आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज घरगुती कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहाल. घरातील वातावरण चांगलं राहील. मात्र, भविष्याविषयी तुम्हाला चिंता वाटू शकते. अशा वेळी नकारात्मक विचार दूर करण्यासाठी चिंतन किंवा योग करा.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला नाक, कान घशाशी संबंधित आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना धनहानीचे संकेत आहेत. त्यामुळे आज कोणताही पैशांचा व्यवहार करु नका. तसेच, गुंतवणुकीसाठी देखील आजचा दिवस योग्य नाही. ग्रहांची स्थिती तुमच्या राशीसाठी अनुकूल नसल्या कारणाने तुम्हाला त्याचे पडसाद भोगावे लागू शकतात. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. मात्र, आज कोणतीही महत्त्वाची कामे हाती घेऊ नका. त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तसेच, आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला तडजोड करावी लागू शकते. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. मात्र, मनासारखा लाभ मिळणार नाही. हिरव्या वस्तू दान करणं शुभकारक ठरेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे पार पडू शकतात. काही नवीन गोष्टी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. लवकरच प्रवासाचे योग जुळून येतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Adhik Maas Amavasya 2026: यंदाची अधिक मास अमावस्या सर्वात पॉवरफुल! 15 जूनपासून 3 राशींचं नशीब फळफळणार, लक्ष्मी कृपेने धनप्राप्ती, उत्पन्नाचे नवे मार्ग...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी व्हायरल! 5 राशींना श्रीमंतीचे योग; भाग्योदयाची हीच वेळ, काऊंटडाऊन सुरू, तुमची रास?
बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी व्हायरल! 5 राशींना श्रीमंतीचे योग; भाग्योदयाची हीच वेळ, काऊंटडाऊन सुरू, तुमची रास?
Ashadhi Ekadashi 2026: 'पंढरपूर वारी' केवळ यात्रा नाही..! आषाढी एकादशीला वारी करण्याचे महत्त्व जाणून थक्क व्हाल, परंपरा, धार्मिक महत्त्व, संदेश, वैशिष्ट्य...
'पंढरपूर वारी' केवळ यात्रा नाही..! आषाढी एकादशीला वारी करण्याचे महत्त्व जाणून थक्क व्हाल, परंपरा, धार्मिक महत्त्व, संदेश, वैशिष्ट्य...
Guru Purnima 2026: गुरूपौर्णिमा येतेय..अनेक पॉवरफुल योगायोग बनतायत! 3 राशींच्या नशीबी राजयोगाचे संकेत, तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त जाणून घ्या..
गुरूपौर्णिमा येतेय..अनेक पॉवरफुल योगायोग बनतायत! 3 राशींच्या नशीबी राजयोगाचे संकेत, तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त जाणून घ्या..
Shani Vakri 2026:  मकर, कुंभ, मीन.. पुढचे 138 दिवस संयमाचे! जुलैपासून शनिची वक्री चाल, आयुष्यात मागोमाग आव्हान, काय काळजी घ्याल? ज्योतिषींचा इशारा...
 मकर, कुंभ, मीन.. पुढचे 138 दिवस संयमाचे! जुलैपासून शनिची वक्री चाल, आयुष्यात मागोमाग आव्हान, काय काळजी घ्याल? ज्योतिषींचा इशारा...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Gold Silver Rate : अमेरिका इराण युद्धामुळं सोने- चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
Embed widget