Horoscope Today 1 June 2024 : पंचांगानुसार, आज 1 जून 2024. आजचा वार शनिवार. जून महिन्यातील आज पहिला दिवस असून हा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आवश्यक कामांची अंमलबजावणी करण्याचा वेग मंदावणार आहे. त्यातील अडचणी लवकर लक्षात येणार नाहीत.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
घरातील मोठ्या लोकांशी मतभेद होतील आणि अशावेळी संघर्षाशिवाय पर्याय नाही.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
घरापेक्षा बाहेरच्या जगामध्ये जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न कराल. कोणतेही यश मिळवण्याची जबरदस्त इच्छाशक्ती ठेवाल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
स्वतःचे आत्मबळ वाढवण्याचा प्रयत्न करा. आलेल्या संधीचं सोनं करणं हे तुमच्याच हातात आहे.
सिंह रास (Leo Horoscope Today)
कामासाठी वेळ काढा कारण ती यशाची किंमत असणार आहे. महिलांनी सर्व गोष्टीसाठी आपल्या अंतर्मनाचा कौल घ्यावा.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
परिस्थिती बघून भावनांची गल्लत न करता केलेला विचार फायदेशीर ठरेल. वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधी चांगली फळे मिळतील.
तुळ रास (Libra Horoscope Today)
तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ लोकांची काळजी घ्यावी लागेल. पैसे मिळतील पण त्याचा संचय केला तर तो फायदेशीर ठरेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
सुख हे मानण्यावर अवलंबून आहे त्यामुळे जेवढी समाधनी वृत्ती ठेवाल तेवढेच सुख लागेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
जवळच्या मित्रांशी थोडे मतभेद होण्याची शक्यता. घरातील वातावरणही थोडे नरम गरम गरम राहील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
कुटुंबातील लोकांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयास पडतील. घराण्यातील जुने हेवेदावे डोके वर काढतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण घेण्यासाठी वेगळ्या वाटा शोधाव्या लागतील. महिलांना घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
बरेच दिवसांपासून घरामध्ये चर्चिला जाणारा एखादा प्रश्न सामोपचाराने सुटेल. घरामध्ये उंची वस्तूंची खरेदी होईल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा :