Love Horoscope : प्रेम ही सर्वात अनपेक्षित घडणारी गोष्ट आहे. एखाद्याच्या आयुष्यात खरं प्रेम (Love) कधी भेटेल याचा अंदाज लावणं तसं कठीणच आहे. काहींना आपल्या आयुष्याचा जोडीदार अगदी कमी कालावधीतच भेटतो. तर, काहीजण खऱ्या प्रेमाच्या शोधातच असतात.  जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात नेमक्या कोणत्या भावना असतात? समोरच्या व्यक्तीशी एकरूप व्हायला त्यांना किती वेळ लागतो? याच संदर्भात प्रत्येक राशीनुसार (Zodiac Sign) त्यांच्या प्रेमाचा रंग नेमका कसा असतो हे आपण जाणून घेणार आहोत.

  


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांमध्ये त्यांच्या आयुष्यावर, भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता जन्मजातच असते. त्यांचा दृढनिश्चयी स्वभाव हा त्यांना जास्त बळकट बनवतो. पण, एकदा जर या व्यक्ती प्रेमात पडल्या तर मात्र यांना कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचं मन वळवू शकत नाहीत. त्यामुळे मेष राशीचे लोक प्रेमात पडताना देखील समोरच्या व्यक्तीमध्ये हे गुण आहेत की नाही हे नक्की बघतात आणि मगच प्रेमात पडतात.     


वृषभ रास (Taurus Horoscope)


स्थिर, विश्वासार्ह आणि चिकाटी हा वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव आहे. हे लोक फार सहज कोणाच्या प्रेमात पडत नाहीत. तसेच, ते खूप व्यवहारिक असतात. त्यामुळे प्रेमात पडताना देखील हे लोक भावनांचा विचार न करता किंवा इमोशनल विचार न करता प्रॅक्टिकल विचारावर भर देतात. पण, जेव्हा या राशीचे लोक प्रेमात पडतात तेव्हा ते आपल्याकडून 100 टक्के देतात. आयुष्यातील सर्व गोष्टींप्रमाणे, या लोकांना प्रेमातही प्रामाणिकपणा जास्त भावतो. त्यामुळे, समोरच्या व्यक्तींत जर हे गुण असतील तर या राशीचे लोक प्रेमात पडू शकतात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशींच्या लोकांचं चिन्ह पाहिल्यास ते जुळ्या मुलांप्रमाणे आहे. तज्ञांच्या मते, जे बुद्धीवान असतात अशा लोकांकडे हे सहज आकर्षित होतात. त्यामुळे जेव्हा ते त्यांच्या बुद्धिमत्तेशी जुलणारे व्यक्ती भेटतात तेव्हाच ते पटकन प्रेमात पडतात. मिथुन राशीच्या लोकांना कंटाळाही फार लवकर येतो. त्यामुळे हे लोक सहजासहजी प्रेमात पडत नाहीत. तसेच, या लोकांना प्रेमातून बाहेर यायला देखील वेळ लागत नाही.  


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीचे लोक फार भावनिक असतात. त्यांच्यासाठी प्रेम हा फक्त टाईमपास नसून एक पवित्र अशी भावना आहे. त्यामुळे हे लोक आयुष्यभर टिकून राहील याच भावनेने प्रेमात पडतात. कारण, हे लोक आपल्या कुटुंबियांना सर्वात आधी प्राधान्य देतात. जर समोरची व्यक्ती भावनिकदृष्ट्या सक्रिय असेल आणि नातेसंबंधात असण्याच्या त्यांच्या अपेक्षांशी जुळत असेल कर्क राशीच्या लोकांना प्रेमात पडायला वेळ लागत नाही. 


सिंह रास (Leo Horoscope)


'संयम' हा मूळात सिंह राशीचा गुणधर्मच नाहीय. या राशीचे लोक पटकन निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. प्रेमात पडण्याचा निर्णयदेखील यामध्ये अपवाद नाही. सिंह म्हणजे सूर्य. या राशीच्या लोकांना इतरांचं आपल्याकडे लक्ष केंद्रित करून घ्यायला फार आवडतं. तसेच, या लोकांना जे त्यांना अटेंशन देतील असे लोक जास्त आवडतात. त्यामुळे हे अगदी सहज प्रेमातही त्यांच्या पडतात. यामुळेच अनेकदा त्यांच्याकडून सर्रास चुकीचे निर्णय घेतले जातात. पण, एकदा ते प्रेमात पडले की, त्यांना एकनिष्ठ राहण्याचे काही ठोस कारण मिळत नाही तोपर्यंत ते अत्यंत निष्ठावान असतात.


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीचे लोक जन्मजातच परफेक्शनिस्ट असतात. हे लोक आपल्या तत्वांशी फार एकनिष्ठ असतात. त्यामुळे यांना तुमच्या प्रेमात पाडणं सहजासहजी शक्य नाही. हे लोक प्रेमात पडण्यासाठी त्यांचा वेळ घेतात. याचं कारण म्हणजे, ज्या व्यक्तीच्या हे लोक प्रेमात पडतायत ते त्यांच्याइतकेच मूल्य आणि नैतिकता जपणारे आहेत की नाही हे ते आधी पाहतात त्यानंतरच ते एखाद्याकडे आकर्षित होतात. तसेच, त्यांना त्यांची लव्ह लाईफ फार परफेक्ट लागते.   


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीचा ग्रह हा शुक्र आहे. आणि शुक्र हा प्रेमाचा ग्रह म्हणून ओळखला जातो. या राशीचे लोक मनातून फार रोमॅंटिक असतात. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्याआधीच यांनी प्रेमाच्या कल्पना तयार केलेल्या असतात. या लोकांना संवाद साधायला आवडतो तसेच, प्रत्येक गोष्टीत बॅलेन्स ठेवायला यांना आवडतं. तसेच, यांना कधीही गृहीत धरण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्यासारखीच आहे याची त्यांना खात्री पडते तेव्हाच ते प्रेमात पडतात. त्यामुळे यांचा विश्वासघात कधीच करू नका अन्यथा जितक्या लवकर ते प्रेमात पडतात तितक्याच सहजतेने ते प्रेमातून बाहेरही पडतात.   


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


या राशीच्या लोकांचं चिन्ह जल आहे. हे लोक उत्कट स्वभावासाठी ओळखले जातात. तसेच, ते बहुतेक समान गुणधर्म असलेल्या लोकांच्या प्रेमात पडतात. वृश्चिक राशीला प्रेमात पडण्यास बराच वेळ लागतो कारण ते सामान्यतः पुरेसा विश्वास निर्माण केल्यानंतरच लोकांच्या प्रेमात पडतात. तसेच, हे लोक त्यांच्या सभोवताली एक गूढ वातावरण निर्माण करतात. त्यामुळे यांना डेट करणं इतकंही सोपं नाही.  


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशींना लोकांना प्रेमात पडण्यासाठी कोणाचीच गरज नसते. कारण हे लोक इतके साहसी असतात की प्रेमाव्यतिरिक्त यांच्या आयुष्यात इतर अनेक गोष्टींना ते प्राधान्य देतात. धनु राशीचे लोक आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी दीर्घकाळ वाट पाहू शकतात. त्यांच्या आयुष्यात साहस प्रथम येते. तसेच, त्यांना प्रवास करायला आणि नवीन गोष्टी शिकायला फार आवडतात. जर त्यांच्याकडे हे सर्व असेल तर ते पूर्णपणे आत्म-संतुष्ट होऊ शकतात. तसेच, ते त्यांच्या स्वातंत्र्याला इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व देतात.


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीचे लोक कठोर परिश्रमांना प्राधान्य देतात. तसेच, ते त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल फार गंभीर असतात. त्यांना त्यांच्यासारखे गुण असणारे आणि पुढाकार घेणारे लोक आवडतात. त्यामुळे समोरची व्यक्तीदेखील आपल्यासारखीच मेहनती असेल तर अशा लोकांच्या हे सहज प्रेमात पडतात. पण, प्रेमात एकनिष्ठ राहायला यांना आवडतं.    


कुंभ रास (Aquarius Horoscope)


धनु राशीप्रमाणेच, कुंभ राशीचे लोक साहसी स्वभावाचे असतात. प्रेमापेक्षा आयुष्यात इतर गोष्टींना, साहसी गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात. त्यांच्यासाठी केवळ एका व्यक्तीबरोबर वेळ घालवण्यापेक्षा मैत्री आणि नेटवर्किंग महत्त्वाचे आहे. कुंभ राशीला प्रेमात पडायला खूप वेळ लागतो. पण, समोरची व्यक्ती देखील आपल्यासारखीच आहे असं जेव्हा यांना वाटतं तेव्हा मात्र ते स्वत:ला पूर्णपणे झोकून देतात.  


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीचे लोक जन्मतःच स्वप्न पाहणारे असतात आणि ते प्रेमात पडण्याच्या कल्पनेच्या प्रेमात असतात. त्यांच्या आयुष्यात अशा गोष्टी घडण्याआधीच त्यांच्या डोक्यात प्रेमाविषयीच्या रोमॅंटिक संकल्पना तयार होऊ लागतात. मीन राशीचे लोक अनेकदा प्रेमात दुखावले जाऊ शकतात. कारण ते खूप लवकर प्रेमात पडतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


June Grah Gochar 2024 : जून महिन्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली! शुक्र, बुध, सूर्यासह शनीही करणार संक्रमण; 'या' राशींवर असणार कुबेरची कृपादृष्टी