एक्स्प्लोर

Horoscope Today 07 July 2023 : मेष, कन्या, मीन राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

Horoscope Today 07 July 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 07 July 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीचे लोक आज वाहन खरेदीचा विचार करू शकतात. वेळ अतिशय शुभ आहे. कन्या राशीच्या लोकांनी आपल्या विरोधकांपासून सावध राहावे. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आजचा शुक्रवार मेष ते मीन राशीसाठी नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. जास्त वेळ घालवायला आवडेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. रात्री जास्त वेळ काम करू नका, नाहीतर तुमची प्रकृती बिघडू शकते. विनाकारण पैसे खर्च करू नका. कामात व्यस्त असण्याबरोबरच आपल्या प्रियजनांसाठी थोडा वेळ काढा. नोकरदार वर्गाने आज आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर वाद घालणे टाळा. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. मात्र वाहन चालवताना अधिक काळजी घ्या, अपघात होऊ शकतो. तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका येऊ देऊ नका आणि तुमच्या स्वभावात राग येऊ देऊ नका. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे तर आज तुम्हाला तुमच्या मेहनतीतून काही मोठा नफा मिळू शकतो. कुटुंबीयांबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या कुटुंबाचे वातावरण चांगले राहील. आज आरोग्याची काळजी घ्या, औषधं वेळेवर घेत राहा. 

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला जुन्या दिर्घकालीन आजारापासून खूप आराम वाटेल. कोणीतरी मोठ्या योजना आणि कल्पनांद्वारे तुमचे लक्ष वेधून घेऊ शकते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी त्या व्यक्तीची सखोल चौकशी करा. तुमच्या अतिरागामुळे जवळची व्यक्ती तुमच्यापासून दूर होऊ शकते त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. तुमचे संवाद कौशल्य प्रभावी ठेवा. मुलांचे भविष्य लक्षात घेऊन पालक पैसे गुंतवतील. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. कलात्मक आणि सर्जनशील क्षेत्रातही वाढ होईल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी बोलताना वाणीतील गोडवा ठेवा.

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे, नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. तुमच्या घराशी संबंधित गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक तणावामुळे तुमची एकाग्रता बिघडू देऊ नका. प्रेमाच्या बाबतीत दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. वेळेवर चालण्याबरोबरच आपल्या प्रियजनांना वेळ देणे देखील आवश्यक आहे. जास्त खर्चामुळे जोडीदाराशी भांडण होऊ शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिकून घ्या जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. भावाच्या लग्नात येणारे अडथळे दूर होतील. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र कुठेतरी जाण्याचा बेत आखतील. भाऊ-बहिणीत सुरू असलेला दुरावा आज संपेल. दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मित्रांची संगत तुम्हाला आनंदी ठेवेल. लग्नाच्या प्रस्तावासाठी वेळ योग्य आहे. आजपासूनच आपल्या मौल्यवान वेळेचा योग्य वापर करायला शिका. जर तुम्हाला उद्या तुमच्या जोडीदाराकडून आपुलकीची अपेक्षा असेल तर हा दिवस तुमच्या आशा पूर्ण करू शकतो. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला काही उत्पन्न मिळेल ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, तुम्ही त्यांच्याबरोबर खेळू शकता आणि त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता, जेणेकरून ते खूप आनंदी दिसतील आणि तुम्हालाही प्रसन्न वाटेल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुम्ही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते, काळजी घ्या. जे अविवाहित आहेत, त्यांना उद्या कोणीतरी खास भेटण्याची शक्यता आहे. तुमच्या चुकीच्या सवयी तुम्हाला भारी पडू शकतात. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. जे लोक नोकरी करत आहेत, त्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. नवीन करार उपलब्ध होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला मिळतील. मानसिक दबाव असूनही तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमच्या जोडीदाराची जवळीक तुम्हाला आनंद देईल. आजचा दिवस थोडा कंटाळवाणा असू शकतो, त्यामुळे तुम्ही काही सर्जनशील कार्य करून तो अधिक मनोरंजक बनवू शकता. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. एखादे काम करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते सहज मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात भटकत आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.  तुम्ही वरिष्ठ सदस्यांकडून पैसे कसे वाचवायचे ते शिकू शकता, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या नकारात्मक वृत्तीमुळे तुमची प्रगती होणार नाही, ही सवय बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काहीतरी खास भेटवस्तू मिळेल. तुमच्या घरातही चांगले वातावरण निर्माण झालेलं असेल.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. नोकरीत चांगली बातमी मिळेल. तुम्ही तुमच्या पदातही वाढ पाहाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्त्रोत मिळतील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्हाला थोडी चिंता जाणवेल. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर वेळ चांगली आहे. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करा. जे समाजसेवेसाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही सर्वांकडून तुमचे काम करून घ्याल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, परंतु तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. आरोग्याबाबत काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार असतील. व्यवसायात कोणताही निर्णय घेताना संभ्रमात राहाल. राजकारणात यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना यश मिळेल. शिक्षकांचेही सहकार्य मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणाऱ्या लोकांना चांगला व्यवहार मिळेल, ज्याचा त्यांना खूप फायदा होईल. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रांचा वापर करतील. तुमचे मित्रही तुम्हाला मदत करतील. नोकरदार लोकांना नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. थोडी विश्रांती घेतली तर बरं वाटेल. आज तुमच्याकडून खर्चाचा अतिरेक होईल. पैशांचा जपून वापर करा. वाहन चालवताना काळजी घ्या. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुमच्या आरोग्यात सुधारणा झालेली दिसेल. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग, प्राणायाम, सूर्यनमस्कारचा समावेश करा. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. व्यवसाय अनुकूल राहील. आज शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडातून फायदा होईल. तुमचा प्रवास यशस्वी होईल. बेरोजगारांसाठी दिवस चांगला आहे. मित्राच्या मदतीने तुम्हाला रोजगार मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली तर तुम्हाला खूप आनंद होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 06 July 2023 : मेष, वृषभ, मकर राशीच्या लोकांनी 'या' चुका करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 31 July 2026: जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget