एक्स्प्लोर

Horoscope Today 06 July 2023 : मेष, वृषभ, मकर राशीच्या लोकांनी 'या' चुका करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 06 July 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 06 July 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या लोकांची कामगिरी चांगली आणि आनंददायी असेल. कन्या राशीला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज तुम्ही वाहन खरेदीचा विचार करू शकता. संधी अतिशय शुभ आहे. आज तुमच्या विरोधकांपासून सावध राहा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आज तुमच्या कुटुंबातील कोणी आजारी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही चुकीच्या निर्णयाचे समर्थन करू नका. कौटुंबिक वादामुळे आज तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. तब्येतीची थोडी काळजी घ्या. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा. स्वतःशी प्रामाणिक राहा. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ऊर्जेने भरलेला असेल. जर तुम्ही प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या प्रवासाचा फायदा होईल. आज संयमाने काम करा. व्यवसायाबद्दल बोलल्यास तुम्हाला व्यवसायात भरघोस नफा मिळेल. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला फायदा होईल. मन:शांतीसाठी एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हा. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. आज तुम्हाला भौतिक सुख-सुविधांचा लाभ मिळेल. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमची तब्येत चांगली राहील. आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. नातेवाईकांकडून तुमची फसवणूक होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांची साथ मिळेल. मित्रांचेही सहकार्य मिळेल. तुमच्या व्यवसायातही नफा होईल. तुमच्या व्यवसायात तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आज तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. कायद्याशी संबंधित कामे पूर्ण करण्यात तुमचे पैसे अधिक खर्च होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज तुम्ही तुमच्या मुलांबरोबर जास्त वेळ घालवा. आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास ज्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून बिघडलेली आहे, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी मोठा फायदा होईल. व्यापाराच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र कुठेतरी जाण्याचा बेत आखतील. भाऊ-बहिणीत सुरू असलेला दुरावा आज संपेल. दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मित्रांची संगत तुम्हाला आनंदी ठेवेल. लग्नाच्या प्रस्तावासाठी वेळ योग्य आहे. आजपासूनच आपल्या मौल्यवान वेळेचा योग्य वापर करायला शिका. जर तुम्हाला उद्या तुमच्या जोडीदाराकडून आपुलकीची अपेक्षा असेल तर हा दिवस तुमच्या आशा पूर्ण करू शकतो. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला काही उत्पन्न मिळेल ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, तुम्ही त्यांच्याबरोबर खेळू शकता आणि त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता, जेणेकरून ते खूप आनंदी दिसतील आणि तुम्हालाही प्रसन्न वाटेल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुम्ही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते, काळजी घ्या. जे अविवाहित आहेत, त्यांना उद्या कोणीतरी खास भेटण्याची शक्यता आहे. तुमच्या चुकीच्या सवयी तुम्हाला भारी पडू शकतात. आजचा दिवस जरा जपून आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. जे लोक नोकरी करत आहेत, त्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. नवीन करार उपलब्ध होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला मिळतील. मानसिक दबाव असूनही तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमच्या जोडीदाराची जवळीक तुम्हाला आनंद देईल. आजचा दिवस थोडा कंटाळवाणा असू शकतो, त्यामुळे तुम्ही काही सर्जनशील कार्य करून तो अधिक मनोरंजक बनवू शकता. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. एखादे काम करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते सहज मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात भटकत आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.  तुम्ही वरिष्ठ सदस्यांकडून पैसे कसे वाचवायचे ते शिकू शकता, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या नकारात्मक वृत्तीमुळे तुमची प्रगती होणार नाही, ही सवय बदलण्याची हीच योग्य वेळ आहे.  हा दिवस तुमच्या सामान्य वैवाहिक जीवनापेक्षा वेगळा असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काहीतरी खास भेटवस्तू मिळेल. तुमच्या घरातही चांगले वातावरण निर्माण झालेलं असेल.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. नोकरीत चांगली बातमी मिळेल. तुम्ही तुमच्या पदातही वाढ पाहाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्त्रोत मिळतील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्हाला थोडी चिंता जाणवेल. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर वेळ चांगली आहे. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करा. जे समाजसेवेसाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही सर्वांकडून तुमचे काम करून घ्याल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, परंतु तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. आरोग्याबाबत काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार असतील. व्यवसायात कोणताही निर्णय घेताना संभ्रमात राहाल. राजकारणात यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना यश मिळेल. शिक्षकांचेही सहकार्य मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणाऱ्या लोकांना चांगला व्यवहार मिळेल, ज्याचा त्यांना खूप फायदा होईल. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रांचा वापर करतील. तुमचे मित्रही तुम्हाला मदत करतील. नोकरदार लोकांना नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. थोडी विश्रांती घेतली तर बरं वाटेल. आज तुमच्याकडून खर्चाचा अतिरेक होईल. पैशांचा जपून वापर करा. वाहन चालवताना काळजी घ्या. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुमच्या मुलांद्वारे तुम्हाला सन्मान मिळेल. तुमच्या आरोग्यात सुधारणा झालेली दिसेल. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग, प्राणायाम, सूर्यनमस्कारचा समावेश करा. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. व्यवसाय अनुकूल राहील. आज शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडातून फायदा होईल. तुमचा प्रवास यशस्वी होईल. बेरोजगारांसाठी दिवस चांगला आहे. मित्राच्या मदतीने तुम्हाला रोजगार मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 2 May 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 21 November 2026: आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Weekly Horoscope: सिंह, कन्या रास..आर्थिक लाभाचे मोठे संकेत! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, निर्णय घेताना घाई करू नका, साप्ताहिक राशीभविष्य..
सिंह, कन्या रास..आर्थिक लाभाचे मोठे संकेत! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, निर्णय घेताना घाई करू नका, साप्ताहिक राशीभविष्य..
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
Weekly Horoscope: मिथुन, कर्क रास.. पैसे जपून वापरा! आर्थिक अडचणी येणार? नोकरीत नवा बदल अनुभवाल, साप्ताहिक राशीभविष्य..
मिथुन, कर्क रास.. पैसे जपून वापरा! आर्थिक अडचणी येणार? नोकरीत नवा बदल अनुभवाल, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget