Horoscope Today 03 May 2025: आजचा शनिवार 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेनं इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 03 May 2025: आजचा शनिवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 03 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 03 मे 2025, आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस आतापर्यंत केलेल्या कामाचे चीज होईल, लोकांसमोर तुमची कला येऊन भरपूर दाद मिळेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमचा उत्साह आज वाढणार आहे, एकाच वेळी अनेक विचारांची गर्दी आणि त्यांचा पाठपुरावा करण्याच्या वृत्तीमुळे वैचारिक गोंधळ होतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज अडचणीतून मार्ग काढण्यासाठी थोडी ध्यान धरणा आणि ओंकार साधना केल्यास बरेच प्रश्न सुटून जातील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात काही भरीव बदल करण्याचे मनात येईल आणि त्याची कार्यवाही करण्यासाठी सज्ज व्हाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज कोणतेही निर्णय विचारांती किंवा तज्ज्ञांची मदत घेऊन केल्यास फायद्याचे ठरतील.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज महिलांनी बोलण्याच्या अगोदर विचार करावा, लोक शितावरून भाताची परीक्षा करणार आहेत
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज आज वेळ वाया न घालवता कामाला लागा. तुमची मुळातच असलेली निरीक्षण शक्ती पणाला लावण्याचा प्रयत्न करा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आपल्या आवडत्या गोष्टींचा सखोल अभ्यास चांगल्या पद्धतीने कराल, महिला जरा मानापमानाच्या जाळ्यात अडकतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज नोकरी धंद्यात कोणत्याही कामासंदर्भात दोन पर्याय डोळ्यासमोर असतील, त्यातून एक पर्याय निवडताना थोडी धांदल होईल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या अंतर्मनाचा आवाज काय साद देत आहे, याचा विचार करून कृती करावी
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज अति तेथे माती हे लक्षात ठेवून आवश्यक तेथे मनाला आवर घालावा लागेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज पूर्वी केलेली आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल, महिलांना मानसिक अस्थिरता जाणवेल
हेही वाचा :
Shani Vakri 2025: पुढचे 138 'या' 3 राशीच्या लोकांनी सांभाळा! शनीची वक्री देणार आर्थिक नुकसान, नात्यात घटस्फोटाची शक्यता?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















