Horoscope Today 03 May 2024 : आजचा दिवस शुक्रवार. हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी सर्वांशी मिळून-मिसळून वागा. कामावर नीट लक्ष द्या. तरच तुमचं प्रमोशन होऊ शकतं. 


व्यापार (Business) - आज कामाच्या ठिकाणी लोक तुमचं मार्गदर्शन घेऊ शकतात. तुमच्या मेहनतीला आज खऱ्या अर्थाने यश मिळेल.


तरूण (Youth) - जे तरूण नवविवाहित आहेत त्यांचा आज जोडीदाराबरोबरचा काळ चांगला जाईल. सामंजस्याने निर्णय घ्याल. पण, तुमच्यात वादही होऊ शकतात.


आरोग्य (Health) - तुम्ही वेळेचं नियोजन करायला शिका. कारण वेळी-अवेळी जेवण्याा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतोय.


सिंह रास (Leo Horoscope Today)


नोकरी (Job) - जे लोक आपल्या बोलण्यातून पैसे कमावतायत जसे की, शिक्षक, रिपोर्टर, काऊंन्सिलर. तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. 


व्यापार (Business) - तुमच्या व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होत जाईल. जे छोटे व्यापारी आहेत त्यांना असाच छोट्या-छोट्या गोष्टीतून लाभ मिळेल.


तरूण (Youth) - तुम्हाला ज्या कार्यात, ज्या क्षेत्रात आवड आहे तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमच्या मेहनतीला नक्की यश मिळेल.


आरोग्य (Health) - गेले अनेक दिवस तुम्ही ज्या आजाराने त्रस्त आहात त्याबाबत एकदा डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या.


कन्या रास (Virgo Horoscope Today)


नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे. अन्यथा लोक तुमच्या स्वभावाचा फायदा उचलतील. 


व्यापार (Business) - कामाच्या निमित्ताने तुम्हाला आज प्रवास करावा लागू शकतो पण यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 


तरूण (Youth) - तरुणांनी वाईट मित्रांची संगत सोडावी. तसेच, आई-वडिलांचा अपमान करू नये. 


आरोग्य (Health) - आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. विशेषत: महिलांनी लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला कमरेच्या खालच्या भागापासून आज दुखू शकतं. त्यामुळे काळजी घ्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Jayanti 2024 : यंदाची शनि जयंती कधी? या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका; शनि देईल कर्माचं फळ, एकामागोमाग येतील संकटं