Shani Jayanti 2024 : शनिला (Shani Dev) सूर्यदेवाचा पुत्र म्हटलं जातं. येत्या 8 मे रोजी शनि जयंती (Shani Jayanti) देशभरात साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मीयांसाठी हा अतिशय खास दिवस आहे. आपल्यावरील आलेलं संकट कमी करण्यासाठी तसेच साडेसाती दूर करण्यासाठी या दिवशी शनिदेवाची विधीवत पूजा केली जाते. तसेच, शनि पिडा दूर करण्यासाठी काही उपाय देखील करणं गरजेचं आहे.


शनि जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते. काही राज्यांमध्ये शनि जयंती वैशाख अमावस्येला साजरी होते तर काही राज्यांमध्ये ती ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. यावर्षी वैशाख अमावस्या 8 मे रोजी आणि ज्येष्ठ अमावस्या 6 जून रोजी आहे. त्यामुळे या दोन दिवशी शनि जयंती साजरी होणार आहे. शनि जयंतीच्या दिवशी जर कोणतीही चूक झाली तर शनिचा कोप होऊ शकतो असं म्हणतात. शनीच्या नाराजीमुळे आर्थिक चणचण, शारीरिक-मानसिक कष्ट, प्रगतीच्या मार्गात अनेक अडथळे यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात. शनिची नाराजी टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात. 


शनि जयंतीच्या दिवशी 'या' चुका करू नका 



  • शनिदेवाच्या पूजेमध्ये तांब्याचे भांडे कधीही वापरू नका. तांब्याचा संबंध सूर्याशी असून सूर्य आणि शनीचे वैर आहे. शनिदेवाचे वडील सूर्यदेव आहेत पण ते त्यांचे परम शत्रू आहेत. त्यामुळे शनिदेवाच्या पूजेत तांब्याचे भांडे वापरू नका. 

  • शनीची दृष्टी नेहमी टाळावी. त्यामुळे शनिदेवाची पूजा करताना कधीही मूर्तीसमोर उभे राहू नका आणि मूर्तीच्या डोळ्यांत पाहू नका. 

  • शनिदेवाची पूजा करताना आपले तोंड पश्चिमेकडे ठेवावे. 

  • शनि जयंतीच्या दिवशी मीठ, लोखंड, तेल खरेदी करू नका. तुम्हाला दान द्यायचं असेल तर एक दिवस आधी खरेदी करा. शनि जयंतीच्या दिवशी शनिशी संबंधित वस्तू घरी आणण्याची चूक करू नका. 

  • शनि जयंतीच्या दिवशी कोणत्याही पशूला त्रास देऊ नका. ही चूक तुमच्या आयुष्यात संकट आणू शकते. तसेच, सजीवाला त्रास देऊ नका.

  • शनि जयंतीच्या दिवशी मांसाहार आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या जीवनात संकटं येऊ शकतात. त्यामुळे ही चूक करू नका.  

  • शनि हा गरीबांचा रक्षक असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी असहाय्य लोक आणि मजुरांना त्रास देऊ नका. तसेच, कोणाची फसवणूक करू नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Jayanti 2024 Date : यंदा शनि जयंती नेमकी कधी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, महत्त्व आणि उपाय