Horoscope Today 01 September 2024 : पंचांगानुसार, आज 01 सप्टेंबर 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आजचा दिवस शिक्षणात थोडे अडथळे येण्याचा आहे. महिलांचा घरामध्ये खूप वेळ जाईल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
उद्योगप्रियते बरोबरच अतिशय व्यावहारिक राहाल, त्यामुळे तुमचे काही अडणार नाही.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
कष्टाची तमा न बाळगता परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा काळ आहे.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
लेखकांना त्यांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देणारे लिखाण करता येईल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
आज सध्या उजळवून टाकणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करायला हवा.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीस उतराल. धंद्यात नवीन कामे मिळतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
भोवताली आवश्यक त्या सुविधा मिळाल्यामुळे कामाचा दर्जा वाढवण्यावर भर राहील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
घरामध्ये दुरुस्तीची अनेक कामे निघतील, त्यामुळे घरात जरा जास्तच वेळ जाईल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
व्यवसाय नोकरी बाबत नवीन धोरणांचा अवलंब कराल आणि त्याची पूर्तताही कराल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मधुर बोलण्यामुळे इतरांची मनं जिंकून घ्याल, घरामध्ये मनासारखी खरेदी कराल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
चैनीच्या वस्तूंची खरेदी होईल, जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
अतिभावनाप्रधान घरामध्ये मंगल कार्य ठरल्यामुळे उत्साही व आनंदी वातावरण निर्माण होईल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: