एक्स्प्लोर

Horoscope Today 01 October 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत मिळू शकते बढती, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 01 October 2023 : रविवार, 1 ऑक्टोबर 2023 चा दिवस कसा असेल? जन्मकुंडलीच्या दृष्टिकोनातून, जाणून घ्या सर्व 12 राशींचे दैनिक राशीभविष्य.

Horoscope Today 01 October 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, 01 ऑक्टोबर 2023, रविवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज कन्या राशीच्या लोकांचा खर्च होऊ शकतो, उर्वरित राशींसाठी आजचा रविवार काय घेऊन येतो? जाणून घ्या आजचे राशीभविष्य 

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणामांसह फलदायी असणार आहे. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदारासोबत रोमँटिक दिवस घालवतील. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या करिअरबाबत तुम्ही कोणताही निर्णय घेत असाल तर त्याबाबत सावधगिरी बाळगा. जर तुम्ही घाईघाईने निर्णय घेतला असेल, तर त्यामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुमच्या कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल, ज्याला पाहून तुम्ही आनंदीत व्हाल.

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुम्ही तुमच्या पालकांचे एखादे स्वप्न पूर्ण कराल, तसेच तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहाल, परंतु तुमचे काही विरोधक तुम्हाला व्यवसायात अडचणीत आणण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. नवीन घर, दुकान इत्यादी घेण्याचे तुमचे स्वप्नही पूर्ण होईल. तुम्हाला कोणत्याही कामात काही अडचण येत असेल तर ती आज दूर होईल.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही ऑफिसचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात व्यस्त असाल, त्यामुळे तुमच्याकडून काही किरकोळ चुकाही होऊ शकतात. तुम्ही कोणतीही महत्त्वाची माहिती बाहेरील व्यक्तीसोबत शेअर करू नये. तुमच्या मनात काही संभ्रम असेल तर, तोही आज दूर होईल.

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने चांगला असणार आहे. जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी झालात, तर तुम्ही अतिशय काळजीपूर्वक बोलाल. व्यवसायात तुमचा एखादा करार निश्चित झाला तर तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्ही लहान मुलांसाठी भेटवस्तू आणू शकता, आज तुमचे काही विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, चिंता करू नका

सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुमच्या आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहील. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आज सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या कोणत्याही कामात दिरंगाई करू नका, अन्यथा अडचणी याल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात सुधारणा करावी लागेल, तरच त्यांची विविध समस्यांपासून सुटका होईल.

कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्या विचाराने आणि समजूतदारपणाने सर्व कामे पूर्ण होतील. राजकारणात काम करणाऱ्या लोकांची वागणूक बघता त्यांच्या मित्रांची संख्याही वाढेल, तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीची चिंता असेल, तर तुमची चिंता दूर होईल. पण तुम्ही तुमच्या जोडीदाराला कुठेतरी डिनर डेटवर घेऊन जाण्याची योजना आखू शकता.

तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायात चढ-उतार घेऊन येणार आहे. तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या अजिबात बदलू नका, अन्यथा समस्या निर्माण होतील. तुम्ही एखाद करार आंधळेपणाने करू नका, व्यवस्थित माहिती घ्या अन्यथा ते तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. तुम्हाला तुमच्या घरगुती कामात काही अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा लागेल, तरच ते पूर्ण होऊ शकेल. तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरच्यांशी बोलावे लागेल.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगला असणार आहे. तुमचा आदर आणि सन्मान वाढल्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन पाहुणे प्रवेश करू शकतात. सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आज त्यांच्या कामामुळे ओळखले जातील आणि त्यांची प्रतिमा अधिक उंचावली जाईल.

धनु
धनु राशीच्या लोकांसाठी, आजचा दिवस एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून कमाईचा दिवस असेल. तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता. परंतु सावधान, जर तुमच्यातील एखादा वाद विकोपाला गेला तर त्यामुळे तुमचे परस्पर संबंध संपुष्टात येतील. मित्राने जर तुम्हाला कोणत्याही योजनेचा भाग बनवले असेल तर खूप विचारपूर्वक पुढे जा. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला असेल, परंतु त्यांना त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल, तरच त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळेल.

मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुम्हाला काही कामाबाबत काही योजना बनवाव्या लागतील, तरच ते पूर्ण करता येईल. नवीन कोर्स करणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या पार्टीला जाऊ शकता, पैशाशी संबंधित कोणताही निर्णय अतिशय हुशारीने घ्या, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल. आईला दिलेले वचन तुम्हाला पूर्ण करावे लागेल.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सुखमय राहील. तुम्हाला तुमच्या मित्रांसमोर तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आजचा दिवस कौटुंबिक नात्यात बळ आणेल. तुमचे कोणतेही काम उद्यापर्यंत पुढे ढकलू नका, अन्यथा अडचणी येऊ शकतात. तुमच्या मनाला कशाचीही चिंता होती, तीही दूर होईल.

मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, परंतु तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चाचा विचार केला पाहिजे, अन्यथा तुम्हाला नंतर आर्थिक हानीचा सामना करावा लागू शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Lucky Zodiac 2024: पुढील वर्ष 'या' राशींसाठी प्रगतीचे, करिअर आणि आर्थिक बाबतीत होईल फायदा! जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget