Holi 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, फाल्गुन महिना फार खास असणार आहे. या महिन्यात होळीचा (Holi 2025) उत्सव देखील साजरा केला जाणार आहे. होळीच्या दिवशी रंगाची उधळण केली जाते. तसेच, होलिका दहनाच्या (Holika Dahan) दिवशी मनातील सगळी जळमटं दूर सारुन नवीन वाटचालीस सुरुवात करतात. खरंतर, ज्योतिष शास्त्रात देखील अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही होळीच्या दिवशी केल्या तर त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
ज्योतिष शास्त्रानुसार, होळीच्या दिवशी राशीनुसार, त्या त्या रंगांचे कपडे परिधान केल्यास पुण्य फळ मिळते. तसेच, अनेक सकारात्मक गोष्टी घडतात. तर, या दिवशी राशीनुसार तुम्ही कोणते कपडे परिधान करावेत ते जाणून घेऊयात.
तुमच्या राशीनुसार 'या' रंगांचे कपडे तुमच्यासाठी शुभ
मेष रास - मेष राशीच्या लोकांसाठी लाल रंगाचे कपडे परिधान करणं शुभ ठरेल.
वृषभ रास - वृषभ राशीच्या लोकांसाठी या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे उठून दिसतील.
मिथुन रास - या राशीच्या लोकांनी या दिवशी हिरव्या रंगाला प्राधान्य द्यावं.
कर्क रास - कर्क राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचे कपडे परिधान करणं शुभ ठरेल.
सिंह रास - या राशीचे लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करु शकतात.
कन्या रास - कन्या राशीच्या लोकांनी हिरवा रंग निवडावा. हा रंग तुमच्यासाठी शुभ ठरेल.
तूळ रास - तूळ राशीच्या लोकांसाठी पांढरा रंग परिधान करणं शुभ ठरेल.
वृश्चिक रास - वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल किंवा पिवळा रंग घालावा.
धनु रास - धनु राशीसाठी हिरवा, लाल आणि राखाडी रंगाचे कपडे परिधान करावेत.
मकर रास - मकर राशीसाठी निळा आणि राखाडी रंग शुभ असेल.
कुंभ रास - कुंभ राशीच्या लोकांसाठी निळा किंवा राखाडी रंगाचे कपडे परिधान करावेत.
मीन रास - मीन राशीच्या लोकांनी हिरवा, लाल किंवा राखाडी रंग परिधान करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: