March 2025 Grahan: ज्योतिषशास्त्रानुसार, जरी मार्च महिना अनेकांसाठी खास असला तरी काही राशींच्या लोकांसाठी अडचणीचा वाटू शकतो. कारण या महिन्यातील दोन ग्रहणामुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात समस्या वाढू शकतात. या महिन्यात चंद्रग्रहण आणि सुर्यग्रहण असे दोन्हीही ग्रहण लागणार आहेत. या महिन्यातील दोन ग्रहणामुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात समस्या वाढू शकतात. या राशींबद्दल जाणून घेऊया..
मार्चमध्ये कधी लागणार हे ग्रहण?
वैदिक पंचांगानुसार, मार्चच्या मध्यावर चंद्रग्रहण आणि त्यानंतर शेवटच्या आठवड्यात सूर्यग्रहण होईल. 14 मार्च रोजी कन्या राशीत वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. 14 मार्चला सूर्यग्रहण मीन राशीत आणि 29 मार्चला सूर्यग्रहण मीन राशीत होईल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मार्च महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सूर्य आणि चंद्रग्रहणामुळे मार्च महिना काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, या राशींची माहिती देणार आहोत. जाणून घ्या..
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात काळजी घ्यावी लागेल. चंद्रग्रहणामुळे कुटुंबातील सदस्यांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात. करिअरबाबत मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. तुम्हाला घसा आणि पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि 14 मार्चला चंद्रग्रहण असल्यामुळे या राशीच्या लोकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जास्त विचार करण्याऐवजी मोकळेपणाने बोलणे तुमच्यासाठी चांगले राहील. पैशाचे व्यवहार करताना विश्वासपात्र ठेवा. लव्ह लाइफमध्ये जोडीदारासोबत मतभेदांमुळे विभक्त होऊ शकतात, काळजी घ्या.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना मार्च महिन्यात नुकसान सहन करावे लागू शकते. या महिन्यात तुम्हाला एक प्रकारची भीती वाटू शकते. अचानक आलेल्या कोणत्याही समस्येमुळे आर्थिक बाजूही डळमळीत होऊ शकते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा.
धनु
ज्योतिषशास्त्रानुसार, राग आणि गैरसमजामुळे कौटुंबिक जीवनात कलह निर्माण होऊ शकतो. मार्च महिन्यात तुम्ही संतुलित पद्धतीने बोलले आणि अधिक ऐकले तर चांगले होईल. तुम्ही कुठे जात असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्या कारण ते चोरीला जाऊ शकतात. या महिन्यात योग, ध्यान आणि देवाचे स्मरण केल्याने तुमची अनेक वाईट कामे दूर होऊ शकतात.
मीन
ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्यात तुमच्या राशीमध्ये सूर्यग्रहण होणार आहे, त्यामुळे तुम्हाला काही मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही निर्णय घेण्यास संकोच करू शकता. कान आणि डोळ्यांशी संबंधित आरोग्य समस्या या राशीच्या काही लोकांसाठी चिंतेचा विषय बनू शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
हेही वाचा>>>
Shani Transit 2025: निश्चिंत व्हा मेष, कन्यासह 'या' 5 राशींच्या लोकांनो! अवघ्या काही दिवसांतच सूर्य-शनिचा मोठा गेम! नोकरीत पगारवाढ, सुख-संपत्ती दारी येईल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )