Chaturgrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मार्चचा महिना फार खास असणार आहे. कारण या महिन्यात 14 मार्च रोजी म्हणजेच आज होळीचा सण देशभरात साजरा केला जातोय. तसेच, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच बुध आणि शुक्र ग्रहाची युती होऊन लक्ष्मी नारायणाचा शुभ राजयोग जुळून येणार आहे. त्याचबरोबर, चंद्र, राहू, बुध आणि शुक्र ग्रह एकत्र मीन राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे चतुर्ग्रही योग जुळून येणार आहे. या योगामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग फार सकारात्मक परिणाम घडवून आणणारा असणार आहे. कारण हा योग या राशीच्या धन आणि वाणी स्थानावर असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. धनसंपत्तीचा लाभ तुम्ही घ्याल. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली सुधारेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
चतुर्ग्रही योग धनु राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. हा योग तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानी आहे. त्यामुळे सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, परदेशी यात्रेचे शुभ योग जुळून येणार आहेत. या काळात जर तुम्हाला वाहन, प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी ही वेळ शुभ असणार आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही यशाचं उंच शिखर गाठाल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग फार लाभदायक ठरणार आहे. कारण या राशीच्या लग्न भावात हा योग जुळून येणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ पाहायला मिळेल. तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. शारीरिक आणि मानसिक त्रासातून तुम्ही मुक्त व्हाल. तसेच, तुमच्या आत्मसन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. वैवाहिक जीवन आनंदी जाईल. वेळेनुसार पैशांची बचत करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
