Hartaklika 2023 : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिका व्रत (Hartalika) करण्यात येते. यंदा 18 सप्टेंबर 2023 या दिवशी हे व्रत करण्यात येईल, तृतीयेच्या दिवशी हे व्रत असल्याने काही भागात याला हरतालिका तीज देखील म्हणतात. या दिवशी स्त्रिया उपवास करतात तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या व्रतामध्ये विवाहित महिला आणि अविवाहित मुली रात्री जागरण करून भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतात.



हरतालिकेच्या दिवशी एक विशेष योग 
या वर्षी हरतालिकेच्या दिवशी एक विशेष योग बनत आहे, ज्याचा महिलांना अनेक पटींनी फायदा होणार आहे. जाणून घ्या हरतालिका तीज व्रताची शुभ मुहूर्त, शुभ योग आणि व्रत का पाळले जाते.


 


हरतालिका 2023 पूजा मुहूर्त


भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी सुरू होते - 17 सप्टेंबर 2023 सकाळी 11.08 वाजता


भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी समाप्त - 18 सप्टेंबर 2023 12:39 वाजता


हरतालिका मुहूर्त - सकाळी 06.07 ते 08.34 (18 सप्टेंबर 2023)


प्रदोष काल मुहूर्त - 06.23 - 06.47 सायंकाळी


 


हरतालिका चार प्रहार पूजा वेळ 


पहिली प्रहर पूजा - 06.23 सायंकाळी - 09.02 रात्री
दुसरी प्रहार पूजा - 09.02 रात्री - 12.15 रात्री, 19 सप्टेंबर
तिसरी प्रहार पूजा - 12.15 रात्री - 03.12 रात्री (19 सप्टेंबर)
चौथी प्रहार पूजा - पहाटे 03.12 ते सकाळी 6.08 (19 सप्टेंबर)



हरतालिका 2023 शुभ योग


या वर्षी हरतालिकेचे व्रत रवियोग आणि इंद्र योगाच्या संयोगाने पाळले जाणार आहे. विशेष म्हणजे हरतालिकेचा दिवस सोमवारी येत आहे. हे व्रत आणि सोमवार दोन्ही भगवान शिवाला समर्पित आहेत. यामुळे हरतालिकेच्या पूजेने महादेव खूप प्रसन्न होतील, असं बोललं जातंय.


इंद्र योग - 18 सप्टेंबर 2023, 04.28 पहाटे - 19 सप्टेंबर 2023, 04.24 पहाटे
रवि योग - 18 सप्टेंबर 2023, 12.08 दुपारी - 19 सप्टेंबर 2023, सकाळी 06.08
सोमवारचा दिवस


 


हरतालिका व्रत कथा


पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने भगवान शिवांना आपला पती म्हणून आधीच स्वीकारले होते, परंतु तिच्या वडिलांनी भगवान विष्णूशी तिचा विवाह निश्चित केला होता. अशा स्थितीत पार्वतीच्या मैत्रिणींनी तिचे अपहरण केले आणि जंगलात नेले. जिथे माता पार्वतीने शिवप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली, तिथे ती भुकेल्या आणि तहानलेल्या अवस्थेत साधना करत राहिली. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला देवी पार्वतीने मातीचे शिवलिंग बनवून तिची पूजा केली. माता पार्वतीच्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारले. माता पार्वतीच्या मैत्रिणींनी तिचे अपहरण करून तिला जंगलात आणले होते, म्हणून हा व्रत हरतालिका तीज म्हणून ओळखला जातो.


 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


इतर बातम्या


Ganesh Chaturthi 2023: यंदाची गणेश चतुर्थी विशेष! वाहन, प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करताय? शुभ मुहूर्त जाणून घ्या