मुंबई : एका महिला रिपोर्टरचा (Female Reporter) लाईव्ह टीव्ही (Live TV) वर विनयभंग (Molestetion) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाईव्ह टीव्हीवर रिपोर्टिंग करताना महिला रिपोर्टरला तरुणाने आक्षेपार्हरित्या स्पर्श (Woman Journalist Molested On Live TV) केला. ही घटना लाईव्ह टीव्हीवर दिसली आणि रेकॉर्डींगही झाली. आता हा व्हिडीओ तुफान चर्चेत आला आहे.


लाईव्ह टीव्हीवर महिला पत्रकाराचा विनयभंग


या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला पत्रकार वार्तांकन करताना दिसत आहे. यावेळी एक पुरुष महिला पत्रकाराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक सोशल मीडिया युजर्सनी संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे. अने युजर्सने संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ स्पेनमधील माद्रिद येथील असून ही घटना गेल्या मंगळवारी, 12 सप्टेंबर रोजी घडल्याचं समोर आलं आहे. या व्हिडीओतील महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.


तरुणाने आक्षेपार्ह पद्धतीने केला स्पर्श


स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार इसा बालाडो चॅनल कुआट्रोसाठी माद्रिदमध्ये चोरीच्या घटनेसंदर्भात लाइव्ह रिपोर्टिंग करत होती. यावेळी मागून येणारा एक माणूस तिच्याजवळ आला आणि त्या पुरुषाने पत्रकार इसाला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला, यामुळे ती अस्वस्थ झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने महिलेला मागून स्पर्श केला आणि ती कोणत्या चॅनेसाठी काम करते, असं विचारलं.


नक्की काय घडलं? पाहा व्हायरल व्हिडीओमध्ये 






घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 


मात्र, या घटनेनंतरही महिला पत्रकारांने वार्तांकन सुरू ठेवलं. हे पाहून स्टुडीओतून कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारा होस्टही आश्चर्यचकित झाला आणि त्याने महिला पत्रकाराला विचारलं ती, "तुझ्या बोलण्यात व्यत्यय आणल्याबद्दल माफी असावी... पण त्याने तुझ्या नितंबाला हात लावला का?" त्यावर महिला पत्रकार अस्वस्थ होऊन हो असं उत्तर देते. यावर अँकर संतापतो आणि म्हणतो की, 'कृपया त्या माणसाला कॅमेरासमोर आण.' ही संपूर्ण घटना लाईव्ह टीव्हीवर घडली.