Lord Hanuman Baby Names : आज हनुमान जयंती आहे. यंदा हनुमान जयंती 23 एप्रिल 2024 रोजी आली आहे. या दिवशी, म्हणजेच चैत्र पौर्णिमेला माता अंजनीच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2024) म्हणून साजरा केला जातो. हनुमान जयंतीला जन्मलेली मुलं फार शूर असतात, असं मानलं जातं. त्यामुळे आपल्या मुलाने देखील हनुमानजींसारखं बलवान आणि धैर्यवान व्हावं, अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या मुलांची खाली दिलेली काही खास नावम ठेऊ शकता.
जर तुम्ही देखील हनुमानाचे भक्त असाल आणि हनुमानाच्या नावावरुन तुमच्या मुलाचं नाव शोधत असाल तर तुम्हाला येथे सांगितलेली हनुमानजींची नावं नक्कीच आवडतील. या नावांसोबतच त्यांचा अर्थही सांगितला आहे. चला तर मग जाणून घेऊया पवनपुत्र हनुमानजींच्या अशा नावांबद्दल जी तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता.
हनुमानाच्या नावावरुन बाळांची नावं (Hanuman Baby Names)
रीतम : हनुमानासारखा पवित्र आणि सुंदर मनाचा. हनुमान हे खूपच निर्मळ अशा मनाचे होते.
रुद्रांक्ष : हनुमानाला भगवान शिवाचा अंश मानला जातो.
शौर्य: निर्भय, पराक्रमी, शूर असा या नावाचा अर्थ आहे.
तेजस: उज्वल, चमचमणारा.
अमित: या दोन्ही नावांचा अर्थ अमर्याद, अथांग असा आहे.
हनुमान: दैवी, देव असा या नावाचा अर्थ आहे.
अनिल: पवनपुत्र, वारा, शुद्ध.
संजू: विजयी, हे नाव फिल्मी वाटेल पण हनुमानाच्या नावावरुन हे नाव ठेवू शकता.
बजरंगी: देवासाठी लढणारा सेनानी असा या नावाचा अर्थ आहे.
चिरंजीवी: अमर असा या नावाचा अर्थ आहे.
इराज: वारा-जन्, हे नाव युनिक आहे.
भक्तवत्सल: त्याच्या भक्तांचा रक्षक, या नावामधील तुम्ही फक्त 'वत्सल' हे नाव देखील निवडू शकता.
महावीर: सर्वात शूर असा.
महातेज: तेजस्वी एक, हे नाव युनिक आहे पण याचा अर्थ खास आहे.
ध्यानंजनेय: ध्यानाची मनस्थिती असा या युनिक नावाचा अर्थ आहे.
ज्ञानसागर: ज्ञानाचा सागर, हे पाच अक्षरी नाव अतिशय युनिक आहे.
जितेंद्रिय: ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला असा तो म्हणजे हनुमान.
वायुनंदन: वायुचा पुत्र, पवन देवता हे नाव अतिशय युनिक आहे.
कलानभ: जो वेळेवर नियंत्रण आणि व्यवस्था करू शकतो.
विश्वेश: सर्वोच्च अस्तित्व असा या नावाचा अर्थ आहे.
प्रतापवत: वैभव असा या नावाचा अर्थ आहे. 'प्रताप' असं देखील नाव निवडू शकता.
उर्जित: उर्जेने परिपूर्ण अर्थ असलेले 'उर्जित' हे नाव खास आहे.
हेही वाचा: