Guruvar Puja Niyam: गुरुवार हा वार भगवान विष्णूचा दिवस आहे. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गुरुवारी अनेक जण उपवास करतात. नोकरी, व्यवसायात यश मिळण्यासाठी किंवा वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी गुरुवारचे व्रत केले जाते आणि भगवान विष्णूती पूजा केली जाते. मात्र गुरुवारचा हा उपवास (Thursday Fasting) करताना काही पदार्थ हे वर्ज्य आहेत. तसेच गुरुवारच्या दिवशी काही पदार्थ खाल्ल्याने त्याचे अनिष्ठ फळ मिळते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कोणत्या गोष्टी खाऊ नये? याविषयी आपण जाणून घेणार आहे.
गुरुवारी जे लोक व्रत करतात त्यांनी विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करावी. गुरुवारी उपवास करण्याचा सर्वात मोठा नियम म्हणजे या दिवशी मीठ सेवन केले जात नाही. संध्याकाळी भगवान विष्णूला गोड नैवेद्य अर्पण करून उपवास सोडतात. भगवान विष्णूचे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्त होते. असे मानले जाते की, अनेक प्रयत्न करूनही कोणतेही काम पूर्ण होत नसेल तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करावी. गुरुवारला आणखी एक नियम खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी खिचडी आणि केळी खात नाहीत.
गुरुवारी केळी का खात नाही?
गुरुवारचा उपवास जरी केला नाही तरी चालेल मात्र चुकूनही केळी खाऊ नये . कारण केळीच्या झाडावर भगवान विष्णूचा वास असतो असे मानले जाते. अशा स्थितीत गुरुवारी केळीची पाने किंवा केळी तोडणे शुभ नाही. तुम्ही गुरुवारी भगवान विष्णूला केळी अर्पण करू शकता परंतु या दिवशी केळी खाण्यास मनाई आहे. गुरुवारी केळी खाल्ल्याने तुम्हाला भगवान विष्णूची पूर्ण कृपा प्राप्त होत नाही. याशिवाय धनाची देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर नाराज होऊ शकते. यामुळे तुम्हाला आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
गुरुवारी खिचडी का खाऊ नये?
गुरुवारी इतर कोणतीही पिवळी वस्तू खाण्यास मनाई आहे. गुरुवारी खिचडी खाणे शुभ मानले जात नाही. असे म्हणतात की गुरुवारी खिचडी खाल्ल्याने तुमचे ग्रह कमजोर होतात आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाही. याशिवाय गुरुवारी खिचडी खाल्ल्याने घरात दारिद्र्य येते. तुमचे उत्पन्न कमी होऊ लागते आणि खर्च वाढू लागतो. जर तुम्हाला तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी पाहायची असेल तर गुरुवारी खिचडी आणि केळी खाणे टाळा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :