UP shahjahanpur Holi: देशाच्या विविध भागात होळीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कुठे रंग उधळून होळी खेळली जाते, कुठे काठ्या, तर कुठे चिखलाने. ब्रजची लाठमार होळी आणि मथुरेची फुलांची होळी तुम्ही ऐकली असेलच. होळीचे नाव ऐकताच रंगांची आठवण होते, पण एक जागा अशीही आहे, जिथे रंगांऐवजी चप्पल मारुन होळी खेळली जाते. होय, भारतात एक असे शहर आहे, जिथे होळी (Holi)  रंगांनी नाही तर चप्पला मारून खेळली जाते. चप्पलने मारणे हे आपल्याकडे सामन्यत: पूर्णपणे अनादाराचे अपमानकारक कृत्य मानले जाते. चप्पलने होळी खेळल्यामुळे  ती  कायमच चर्चेत आहे. चला तर मग जाणून घेऊया या होळी बद्दल. 


उत्तरप्रेदशातील  शाहजहापूर येथे चप्पल मारत होळी खेळण्याची परंपरा आहे. य परंपरेला ते जुतमार असे म्हणातात.   18व्या शतकात शाहजहापूरमध्ये नवाबाची मिरवणूक काढून होळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली, जी कालांतराने  चप्पल मारण्याच्या होळीमध्ये बदलली.   1947 नंतर ही होळी जोडे मारून खेळली जाऊ लागली. होळीच्या दिवशी शाहजहांपूरमध्ये 'लाट साहेब'ची मिरवणूकही निघते.


चप्पल मारत होळी खेळण्याची परंपरा कशी सुरू झाली?


उत्तर प्रदेशातील शाहजहापूर शहर नवाब बहादूर खान यांनी वसवले होते.  जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार  खान घरण्याचे शेवटचे  शासक नवाब अब्दुल्ला खान हा अंतर्गत वादामुळे फारुखाबादला गेला होता. अब्दुल्ला खान हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समुदायांमध्ये लोकप्रिय होते. 1729  मध्ये तो शाहजहानपूरला परतले. त्यावेळी त्यांचे वय 21 वर्षे होते. शाहजहानपूरला परतल्यानंतर पहिली होळी आली तेव्हा दोन्ही समाजातील लोक त्यांना भेटण्यासाठी राजवाड्याच्या बाहेर उभे होते. नवाबसाहेब बाहेर आल्यावर त्यांनी होळी खेळली. होळी साजरी करताना लोकांनी  उंटावर बसवून मिरवणूक काढली. तेव्हापासून होळी शाहजहानपूरमध्ये मोठ्या उत्साहात खेळली जाते.  


जोडे मारून खेळली जाते होळी


1858 मध्ये खान बहादूर खानच्या कमांडर मर्दान अली खान याने हिंदूंवर हल्ला केला ज्यामुळे शहरात धार्मिक तेढ निर्माण झाला. हा हल्ला करण्यात इंग्रजांचाही हात होता. इंग्रजांबद्दल लोकांमध्ये प्रचंड रोष होता, त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांनी नवाब साहेबांचे नाव बदलून 'लाट साहेब' केले आणि उंटऐवजी म्हशीवरून मिरवणूक काढली. तेव्हापासून लाटसाहेबांना जोडे मारण्याची परंपरा सुरू झाली. ही परंपरा इंग्रजांबद्दलचा राग व्यक्त करण्याचा एक मार्ग होता.


म्हशीवरून काढली जाते मिरवणूक 


शाहजहांपूरच्या होळीत केवळ जोडे फेकले जात नाहीत तर येथे व्यक्तीला लाट साहेब म्हणून म्हशीवर बसवले जाते. यानंतर सर्वजण म्हशीला जोडे मारतात. काही लोक बुटांसह चप्पल आणि झाडू इत्यादी वापरतात. केवळ होळीच नाही तर मथुरेच्या बछगावमध्ये होळीच्या दिवशी चप्पल मारुन  होळी साजरी केली जाते. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू असून त्यामागे वेगवेगळी कारणे दिली जातात.


हे ही वाचा :



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)