पुणे : मागील काही दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत  (Pune Metro)  असलेल्या रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी (Ruby Hall to Ramwadi Metro) या मार्गिकेचं आज अखेर उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईनपद्धतीने या मार्गिकेचं उद्घाटन केलं जाणार आहे. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा पुणे मेट्रो मार्ग-2 दुपारपासून सुरू होणार आहे.


पुणे मेट्रोचे संचालक  अतुल गाडगीळ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11.30 वाजता कोलकाता येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मार्गाचे उद्घाटन करतील. हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रुबी हॉल ते रामवाडी या दोन मेट्रो गाड्या चालवणार आहोत.  


उद्घाटनानंतर दोन तासांनी प्रवासी सेवा सुरू होईल, अशी माहिती पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली. दुपारचे एक वाजले असतील. दुपारी एकच्या सुमारास रुबी हॉलपूर्वी मेट्रो रामवाडीकडे रवाना होईल. रुबी हॉल ते रामवाडी हे अंतर साडेपाच किलोमीटर असून, उद्घाटनानंतर पुणे मेट्रो वनाझ ते रामवाडी हे 15.7 किलोमीटरचे अंतर पार करणारी लाइन 2 पूर्ण करणार आहे.


पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या पुणे मेट्रो मार्ग-1 कॉरिडॉरच्या निगडी विस्तारित भागाच्या कामाचे ही उद्घाटन होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित रस्त्याच्या कामाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले. हा कार्यक्रम पीसीएमसी मेट्रो स्थानकावर होणार आहे.


उबाठा आक्रमक अन् मेट्रोचा मुहूर्त लागला...



मागील काही दिवसांपासून पुणे मेट्रो वेगवेगळ्या कारणावरुन चर्चेत आहे. पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचं काम पूर्ण होऊन त्याची ट्रायलदेखील पार पडली आहे. मात्र तरीही ही मार्गिका मेट्रो प्रशासनाकडून सुरु करण्यात येत नाही आहे. त्यात मध्यंतरी पुणे मेट्रोच्या या मार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. मात्र त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला. त्यानंतर लवकर ही मार्गिका सुरु होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सगळं काम तयार असूनही या मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनाला विलंब केला जात होता. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आक्रमक झाला होता आणि त्यांनी थेट मेट्रो कार्यलयाला घेराव घातला होता. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात ईडीची उडी; आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागवली!