Gudi Padwa 2024: हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येणारा गुढीपाडव्याचा सण हा महाराष्ट्रात नवीन वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण आपल्या आयुष्यात एक समृद्धी आणतो आणि वाईट गोष्टींपासून बचाव करतो असं मानलं जातं. त्यासाठी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते. महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) रूपाने आपण निसर्गातील नवनिर्मितीचे स्वागत करतो. हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहे. गुढीपाडवा साजरा करण्याअगोदर घरात काही बदल केल्यास घरात सुख, समृद्धी आणि धन प्राप्तीहोती. घरात सकारात्मक वातावरण राहते.


गुढीपाडव्या अगोदर करा या तीनच गोष्टी


देवघराचे सुशोभीकरण


देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते.  नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दिशांचा विचार करुनच देवघराची जागा निवडावी.   घरात सकारात्मक उर्जा वाढविण्याकरता देवाला ताजी फुले वाहावी. त्याआधी देवाची तुटलेली फ्रेम, खंडीत मुर्ती, निर्माल्य वाहत्या पाण्यात वाहून द्या. देवघरात स्वस्तिक, कळस, ॐ चे चिन्ह लावा. देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा. तुटलेली घंटी काढून टाका.


घराचे सुशोभीकरण करा


आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवण्यासाठी घराला रंग द्या. हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणीचं सामान घराबाहेर काढा. जर खोलीचे दरवाजे  आवाज करत असतील तर ते बदला.  ते  आपल्या घरातील नकारात्मक शक्तींचे प्रतीक आहे. दरवाज्यावर स्वस्तिक, शुभ लाभचे चिन्ह लावा. तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या.


स्वयंपाकघराचे सुशोभीकरण


घरात नेहमी अन्न धान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धणे अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालावे. यामुशे घराची सुरक्षा वाढते. घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य, पिठ खराब झाले असल्यास किंवा त्यात किड पडली असल्यास ते स्वच्छ करावे. स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकावी. फ्रिजची स्वच्छता ठेवावी. स्वयंपाकघर स्वच्छ राहील्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हे ही वाचा :


Chanakya Niti: सिंह म्हणून जन्माला आलात सिंहासारख जगायला शिका..! चाणक्य म्हणतात,जंगलाच्या राजाकडून शिका 'या'चार गोष्टी, मिळेल घवघवीत यश