Korean Beauty Secrets : तुम्ही जर कोरियन (Korean Beauty) लोकांना पाहिले असेल, तर तुम्ही त्यांच्या चमकणाऱ्या त्वचेकडे (Skin Care) पाहून आश्चर्यचकित व्हाल, अशी त्वचा जर आपली असेल तर ती कोणाला आवडणार नाही... या लोकांची त्वचा अगदी काचेसारखी चमकते. त्यालाच ग्लास स्किन असं बोलतात. पण अशी त्वचा हवी असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? कोरियन ब्युटी रूटीन जगात तसेच भारतात खूप प्रसिद्ध झाले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे तुमची त्वचाही कोरियन लोकांच्या त्वचेसारखी अगदी काचेसारखी इतकी चमकेल... जी सर्वजण पाहतच राहतील, आणि तुम्हालाही यामागील ब्युटी Secret विचारतील...


कोरियन सौंदर्य भारतातही खूप प्रसिद्ध


कोरियन सौंदर्य दिनचर्या गेल्या काही वर्षांत खूप प्रसिद्ध झाली आहे. शीट मास्क, मेकअप, ग्लास स्किनने कोरियन स्किन केअर रूटीनला एका नवीन स्तरावर नेले आहे, आता इतर देशांसोबत भारतातही खूप प्रसिद्ध होत आहे. त्यांच्या या त्वचेचं सीक्रेट सांगायला गेलं तर, या स्किन रूटीनमध्ये आरोग्यदायी आहाराद्वारे त्वचेची काळजीही घेतली जाते. तर आज आम्ही तुम्हाला ग्लोइंग स्किनसाठी कोरियन लोकांच्या रुटीनमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केला जातो? ते सांगत आहोत...


कोरियन लोक स्किन केअर रूटीनमध्ये कशाचा समावेश करतात?


अलीकडच्या काळात कोरियन ब्युटी रूटीन जगात तसेच भारतात खूप प्रसिद्ध झाले आहे. यासाठी महिला आणि पुरुष वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात पण अनेक वेळा त्यांना सारखे सौंदर्य मिळत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही पद्धती सांगत आहोत, ज्या कोरियन लोक त्यांच्या स्किन केअर रूटीनमध्ये समाविष्ट करतात.



डबल क्लिंजींग


कोरियन सौंदर्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते डबल क्लिंजींग करतात, ज्यामध्ये त्वचा दोनदा धुतली जाते. विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यासाठी प्रथम तेल आधारित क्लिंजरने. दुसऱ्यांदा मेकअप आणि सनस्क्रीन काढण्यासाठी क्लिंझरने त्वचा साफ करतात. हे ड्युअल क्लींजिंग टेक्निक त्वचेला हायड्रेट ठेवते.


 


हायड्रेशन


कोरियन सौंदर्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे ते नेहमी हायड्रेटेड राहतात. पाणी पिण्याव्यतिरिक्त ते त्वचेला अनेक प्रकारे हायड्रेट ठेवतात. सुरूवातीला ते हलक्या क्लिंझरने सुरुवात करतात आणि नंतर टोनर, सीरम वापरतात. त्वचेला खोलवर पोषण मिळावं यासाठी hyaluronic ऍसिड असलेल्या हलक्या इसेंसचा वापर करतात.


 


अँटिऑक्सिडंट


फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी, ते त्यांच्या आहारात ग्रीन टी आणि व्हिटॅमिन सी सारख्या अँटिऑक्सिडंट-समृद्ध घटकांचा समावेश करतात. हे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात आणि अकाली वृद्धत्व टाळतात.


 


सनस्क्रीन


कोरियन सौंदर्यात सनस्क्रीनचा दररोज वापर केला जातो. हे केवळ अतिनील किरणांपासून संरक्षण देत नाही, तर अकाली वृद्धत्व टाळण्यास आणि त्वचा निरोगी बनविण्यात मदत करते. म्हणूनच ते रोज सनस्क्रीन लावतात.


शीट मास्क


कोरियन ब्युटी रूटीनमध्ये शीट मास्कला खूप महत्त्व आहे. त्वचेच्या खोल स्वच्छतेसाठी ते शीट मास्क लावतात. त्यात सीरम असतात जे त्वचेची लवचिकता सुधारतात, हायड्रेशन वाढवतात आणि चमक वाढवतात.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Summer Beauty Tips : सन टॅनिंग, सन बर्न टाळाचंय? 'हे' घरगुती सन प्रोटेक्शन त्वचेवर लावा, केमिकलपासून राहा दूर