Gemini Weekly Horoscope 6 to 12 May 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, मे महिन्यातला दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा मिथुन राशीसाठी नेमका कसा असणार आहे? मिथुन राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मिथुन राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मिथुन राशीचे करिअर (Gemini Career Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात थोडीशी चिंताजनक असू शकते. पण उत्तरार्ध मात्र सुख-समृद्धीचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी अचानक तुमच्यावर नवीन जबाबदारी पडू शकते. जी पार पाडण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तसेच, सहकाऱ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. तुमच्या कामाची चर्चा होईल. 


मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Money Wealth Horoscope)


आर्थिक बाबतीत बोलायचे झाल्यास, तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. व्यवहारात तुमच्या प्रगती दिसून येईल. तसेच, मोठमोठ्या कंपन्यांकडून तुमच्यासाठी विचारणा होईल. नोकरीच्या अनेक संधी मिळतील. 


मिथुन राशीचे प्रेमसंबंध (Gemini Love Horoscope) 


जे लोक प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. जोडीदाराबरोबर छान संवाद साधाल. एकमेकांना वेळ द्याल. कुटुंबीयांबरोबर देखील तुमचे संबंध चांगले असतील. कुटुंबीयांबरोबर धार्मिक स्थळाला भेट द्याल. तसेच, तुमचे वैवाहिक संबंध चांगले असतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology : सोन्याची अंगठी, पिवळा रूमाल, पेन आणि बरंच काही...जन्मतारखेनुसार 'ही' वस्तू तुमच्यासाठी लकी; स्वभावातील दोष कमी करण्यासाठी या वस्तू लाभदायी