Gemini Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, जुलै महिन्यातील शेवटचा आठवडा संपत आला आहे. लवकरच नवीन महिन्यासह नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. हा नवीन आठवडा मिथुन राशीसाठी नेमका कसा असणार आहे? मिथुन राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मिथुन राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Love Horoscope)


तुमची लव्ह लाईफ या आठवड्यात चांगली असेल. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या नुकताच ब्रेकअप झाला असेल त्यांनी भूतकाळातील गोष्टी विसरण्यासाठी एखाद्या खास व्यक्तीसोबत वेळ घालवाव. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांनी आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे आणि त्यांच्या भावना पार्टनरसोबत शेअर केल्या पाहिजे. मनमोकळेपणाने बोलून नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा.


मिथुन राशीचे करिअर (Gemini Career  Horoscope)


या आठवड्यात कामाच्या ठिकाणी हुशारीने काम करा. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा, कोणत्याही वादात पडू नका. सहकाऱ्यांसोबत चांगल्या पद्धतीने वागा, यामुळे तुम्हाला सर्व कामांमध्ये त्यांची मदत मिळेल. मिथुन राशीचे काही लोक या आठवड्यात नोकरी बदलू शकतात. काही लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. आज विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.


मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)


नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील. तुम्ही तुमचं एकूण उत्पन्न आणि खर्च यात संतुलन ठेवलं पाहिजे. उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणुकीचे निर्णय अत्यंत हुशारीने घ्या. काही लोक या आठवड्यात शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात वडिलांकडून पैसे मिळू शकतात.


मिथुन राशीचे आरोग्य (Gemini Health Horoscope)


या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तुमच्या दैनंदिन जीवनात काही शारीरिक हालचालींचा समावेश करा. फिरायला जा, व्यायामशाळेत जा किंवा घरीच व्यायाम करुन पहा. सकस आहार घ्या आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. स्वतः ची काळजी घेण्यात स्वत:ला व्यस्त करा, ध्यान देखील करा. आपल्या मानसिक आरोग्यासह शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या