Pooja Khedkar Update : आपल्या अनेक कारनाम्यांमुळे चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. पूजा खेडकर (Pooja Khedkar) कूठे आहे हा प्रश्न आता वेगवेगळ्या तपास यंत्रणांना पडला आहे. यू.पी.एस.सीने प्रशिक्षण थांबल्यानंतर पूजा खेडकर (Pooja Khedkar) वाशीम मधून निघाल्यावर कुठे गेली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिल्ली पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, खरा पण ती अद्याप दिल्ली पोलिसांना भेटलेली नाही. पुणे पोलिसांनी तीनवेळा नोटीस बजावून देखील ती पुणे पोलिसांसमोर हजर झालेली नाही यू.पी.एस.सीने तिला मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात बोलावल्यानंतर ती मसुरीला प्रशिक्षण केंद्रात गेली की नाही हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे पुणे पोलिसांनी पूजा खेडकर (Pooja Khedkar) आई वडीलांचा घटस्फोट खरंच झाला होता का याबाबत तपास करुन त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.
पूजा खेडकरच्या आई वडिलांच्या घटस्फोटासंदर्भात तपासाचा अहवाल केंद्रकडे सादर
पूजा खेडकर आणि कुटुंबियांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर (Pooja Khedkar) आई वडिलांच्या घटस्फोटासंदर्भात तपासाचा अहवाल केंद्रकडे सादर करण्यात आला आहे. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडिव दिलीप खेडकर यांच्या वैवाहिक संबधाबाबतचा तपास करून त्याचा अहवाल पुणे पोलिसांनी केंद्र सरकारला सादर केला आहे. त्यानंतर आता केंद्र सरकार पूजा खेडकर (Pooja Khedkar) आयएएस होण्यासाठी सादर केलेल्या नॉन-क्रीमी लेयर सर्टिफिकेट वैध ठरवायचं की नाही याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरने आयएएस होण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतण्यासाठी नॉन-क्रीमी लेयर सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्यासाठी पूजा खेडकर (Pooja Khedkar) तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचा दावा केला होता.
मात्र, 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवताना सादर केलेल्या शपथपत्रात दिलीप खेडकर (Pooja Khedkar) यांनी मनोरमा खेडकरचा उल्लेख पत्नी म्हणून केला होता. पुणे पोलिसांनी याचा अहवाल केंद्राला पाठवला आहे. तर दुसरीकडे पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि दिलीप खेडकर (Dilip Khedkar) गायब आहेत. वाशिमवरून पूजा खेडकर (Pooja Khedkar) कुठे गेली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबतचा अहवाल पुणे पोलिसांनी केंद्राला पाठवला. दरम्यान खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट २०१० मध्ये झाला असला तरी त्यांच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी चौकशी करून महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाब अहवालात नोंदवले आहेत. केंद्र शासनाकडून घटस्फोटासंदर्भात अहवाल मागवण्यात आला होता. पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिने यूपीएससीच्या निवड प्रक्रियेमध्ये कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.