Weekly Horoscope  25 Feb To 2 March 2024: दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक राशिभविष्य आठवड्याचा अंदाज असतो. फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा 25 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान असणार आहे. आजपासून या आठवड्याला सुरुवात झाली आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.  या आठवड्यात कामासाठी बाहेरगावी जावे लागेल. प्रवासाचा योग आहे. कुटुंब आणि मित्रमंडळींचा पाठिंबा तुम्हाला मिळेल.


मिथुन राशीचे लव्ह लाईफ(Gemini Love Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेमसंबंधात अनुकूलता राहील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जोडीदारासोबत  आनंदाचे  क्षण घालवाल.  आपल्या मनातील भावना आपल्या जोडीदारासमोर व्यक्त करा. मनमोकळेपणाने संवाद साधा


मिथुन  राशीचे करिअर (Gemini Career Horoscope) 


कामाच्या ठिकाणी इतरांप्रती तुमचा न्यूनगंड तुमच्या मनात अनेक शंका निर्माण करू शकतो. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने पाहाल.  त्यामुळे सहकाऱ्याचा पाठिंबा मिळणार नाही. तुमच्या करिअरमधील प्रगतीवरही  परिणाम होण्याची शक्यता आहे.   कामाच्या ठिकाणी सहकारी आणि कुटुंबातील सदस्यांशी वाद घालणे टाळा


मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)


मिथुन राशीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यासाठी सध्या चांगला काळ आहे. वाहन चालवणाऱ्या लोकांनी ते चालवताना थोडे अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. चालवताना निष्काळजीपणा केल्यास वाहनाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.  त्याच्या नुकसानीमुळे, तुम्हाला तुमचे पैसे त्यावर खर्च करावे लागतील. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.  अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रलोभनांना बळी पडू नका 


मिथुन राशीचे आरोग्य  (Gemini Health Horoscope) 


 तुम्हाला या आठवड्यात छोट्या-छोट्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, पण या काळात कोणतीही आरोग्यविषयक  मोठी  समस्या उद्भवणार नाही.  तरीही तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत गाफील न राहता वेळोवेळी योगाभ्यास करावा. ध्यान आणि व्यायाम करत राहा जेणेकरून तुम्ही स्वतःला सक्रिय आणि तंदुरुस्त ठेवू शकाल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :