Lakshmichya Pavalani : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी (Lakshmichya Pavalani) ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. कला चांदेकरांच्या घरात सुनेचा मान मिळवण्यासाठी धडपड करतेय. त्यातच सरोजने गृहप्रवेशाच्या वेळी कलाला तिच्या घरच्यांसोबतचे सगळे संबंध तोडायला सांगते. त्यानंतर कला तिच्या माहेरच्यांसोबत कोणताही संपर्क करत नाही. म्हणून लेकीला भेटण्यासाठी संगीता चांदेकरांच्या घरी पोहचते. पण त्यावेळी संगीतावर चोरीचा आळ घेतला जातो.
संगीता जेव्हा घरी येते तेव्हा रजनी कलाला अद्वैतच्या खोलीत तिला घेऊन जायला सांगते. अद्वैतच्या खोलीत काही दागिने असतात. त्यावेळी रजनी संगीताला एक हार घालायला सांगते. संगीता तो हार घालून पाहत असताना अद्वैत तिथे येतो आणि संगीतावर चोरीचा आळ घेतो. त्यावेळी कला तिच्या आईवरचा चोरीचा आळ खोटा असून संगीतानेच तो हार घालायला सांगितलेला असतो. अद्वैत आणि सरोज कलाच्या आईवर चोरीचा आळ घेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्याची देखील भाषा करतात. त्यावेळी आबामध्ये पडून रजनीला प्रश्न विचारतात.
सरोज देणार का विहिणीचा मान?
रजनीनेच तो हार संगीताला घालायला सांगितल्याचं सगळ्यांच्या समोर येतं. त्यानंतर कला तिच्या आईला घरातून जायला सांगते आणि परत कधीच या घरात येऊ नको असं म्हणते. संगीता लग्नानंतर पहिल्यांदाच चांदेकरांच्या घरी जाते, पण तिथे तिचा अशाप्रकारे अपमान केला जातो. संगीता तिच्या घरी परत जात असताना सरोज संगीताला थांबवते. त्यामुळे आता सरोज संगीताला विहिणीचा मान देणार की आणखी अपमान करणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागली आहे.
कलाला मिळतेय नयनाच्या वागण्याची शिक्षा
अद्वैत चांदेकर आणि नयना खरे या दोघांच्या लग्नाची धामधुम दोन्ही घरात सुरु होती. पण ऐन लग्नाच्या दिवशी नयना मांडवातून पळून जाते. त्यामुळे नाईलाजास्तव संगीताला कलेला नयनाच्या जागी उभं करावं लागतं. जेव्हा हे सत्य चांदेकरांच्या समोर येतो तेव्हा अद्वैत या लग्नाला नकार दतो, पण आबांच्या शब्दाखातर त्याला हे लग्न करावं लागतं. पण आता चांदेकरांनी अजूनही कलाला सून म्हणून स्विकारलं नाहीये. त्यामुळे कलाला अनेक गोष्टींना समोरं जावं लागणार आहे.
नयना ही अद्वैतचा भाऊ राहुल याच्यासोबत पळून गेलीये. त्यामुळे हे सत्य जेव्हा चांदेकरांसमोर येईल तेव्हा चांदेकर करणार हे पाहणं महत्त्वाटचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे हे सत्य समोर आल्यानंतर चांदेकर कलाला स्विकारणार का याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीये.