एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 21 November 2023: मिथुन राशीच्या लोकांवर आज कामाचा अधिक भार; थकवा जाणवेल, पाहा आजचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 21 November 2023: मिथुन राशीच्या लोकांना आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मिथुन राशीच्या आजच्या दिवसाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Gemini Horoscope Today 21 November 2023: मिथुन राशीच्या लोकांसाठी  आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. ऑफिसमध्ये मात्र आज कामाचा ताण असेल. जास्त कामामुळे आज थकवा जाणवू शकतो. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आज तुम्ही जास्त पैसे खर्च करू शकता, त्यामुळे खर्चाला आज आवर घालणं आवश्यक असणार आहे. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा एखादा दुखावू शकतो.

मिथुन राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

जर तुम्हाला आज नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल, तुम्ही नवीन काम सुरू करू शकता, त्यात तुम्हाला नफाही मिळेल, पण कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पालकांचा सल्ला घ्यावा.

मिथुन राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला ऑफिसमध्ये आज खूप काम करावं लागेल. आज कामाचा जास्त भार असेल आणि ऑफिसमध्ये जास्त कामामुळे तुम्हाला थकवाही जाणवू शकतो.

मिथुन राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमचं कौटुंबिक जीवन चांगलं असणार आहे. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी तुमचा बऱ्याच काळापासून वाद चालू असेल तर आज तो वाद सोडवला जाऊ शकतो. तुमच्या घरात शांततेचं वातावरण राहील. तुमच्या घरात एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, परंतु काही कारणामुळे तुमचा आदर कमी देखील होऊ शकतो.

आज तुम्ही तुमच्या एखाद्या जिवलग मित्राला भेटू शकता, त्याला भेटून तुम्ही दोघं फिरायलाही जाऊ शकता. आज तुम्ही दिखावा करून पैसेही खर्च करू शकता. परंतु तुम्ही तुमचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा, भविष्यात ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल, अन्यथा तुम्हाला भविष्यात पैशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यामुळे तुम्हाला अपमानही सहन करावा लागू शकतो. कोणाशीही बोलण्याआधी शंभर वेळा विचार करा, कारण तुम्ही जे बोलता त्यामुळे एखादा दुखावला जाऊ शकतो. 

मिथुन राशीच्या लोकांचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कामाच्या ताणामुळे आज तुमचं डोकं दुखू शकतं.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. आज तुमच्यासाठी 4 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Guru Gochar 2024: गुरुच्या मार्गक्रमणामुळे 2024 मध्ये 'या' 3 राशींना धनलाभ; अडकलेली कामं होणार पूर्ण

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Embed widget