Gauri Visarjan 2025 : सध्या सगळीकडेच लाडक्या बाप्पाचा (Ganeshotsav) उत्सव सुरु आहे. घरोघरी गणपती आणि गौरी आवाहन झाल्यानंतर उद्या मह्णजेच 2 सप्टेंबर 2025 रोजी गौरी विसर्जन (Gauri Visarjan) केलं जाईल. त्यामुळे आपल्या गौराईचं विसर्जन अगदी पारंपरिक पद्धतीने आणि थाटामाटात निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी प्रत्येकाच्याच घरी लगबग पाहायला मिळतेय. मात्र, गौरी विसर्जनाच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. काही चुका जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच गौरी विसर्जन चांगलं पार पडेल.
ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा मुहूर्त (Jyeshtha Gauri Visarjan Muhurta 2025)
गौरी पूजनाच्या तिसऱ्या दिवशी गौराईचं विसर्जन केलं जातं. त्यानुसार, यंदा भाद्रपद शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला 2 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच उद्या गौरीचं विसर्जन करावं. गौरी विसर्जन मूळ नक्षत्रावर सूर्योदयापासून रात्री 9:51 पर्यंत गौरी विसर्जन करावे. या दिवशी सात दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन देखील होणार आहे.
गौरी विसर्जन करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या
- गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. लक्षात ठेवा गौरीची पूजा ही गौरीचे आभार मानण्यासाठी आणि गौरीला निरोप देण्यासाठी केली जाते.
- गौरीच्या उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद, कुंकू, नारळ, सुपारी, अगरबत्ती आणि फराळाचे पदार्थ अर्पण करावेत.
- गौरी विसर्जनाच्या वेळी 5 सौभाग्यवती महिलांना बोलावून थाळीचे वाण दिले जाते. आधी ताट देवीसमोर दाखवावे नंतर त्याची पूजा करावी.
- गौरीची आरती झाल्यानंतर देवीवर अक्षता वाहून तिला दही भाताचा नैवेद्य दाखवावा. सोबतच विडा द्यावा.
- गौरी मुखवट्याच्या म्हणजेच पंचधातूंच्या, सोन्या-चांदीच्या असतील तर दागिने घातले असतील तर ते काढून देवीचे विसर्जन करावे.
- देवीच्या विसर्जनानंतर त्यातली थोडी माती आणून घरात चौरंगावर ठेवावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :