एक्स्प्लोर

Gauri Pujan 2024 : सोन्याच्या पावलांनी गौराई आली...गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? 'अशी' करा पूजेची मांडणी

Gauri Pujan 2024 : गौरी पूजन हे महाशक्तीचं पूजन म्हटलं जातं. ही महाशक्ती म्हणजे पार्वती आणि ती शंभूमहादेवाची शक्ती आहे.

Gauri Pujan 2024 : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2024) सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जातोय. घरोघरी गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता गौराईंचं (Gauri Pujan) आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज गौरी पूजनाचा दिवस आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे की, गौराईचं आवाहन अनुराधा नक्षत्रावर, पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर, तर विसर्जन मूळ नक्षत्रावर केलं जातं. 

गौरी पूजन हे महाशक्तीचं पूजन म्हटलं जातं. ही महाशक्ती म्हणजे पार्वती आणि ती शंभूमहादेवाची शक्ती आहे. सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आवाहन, पूजन म्हणजे घरात भरभराट, आनंद, ऐश्वर्य आणि सुख-संपत्ती येते असं म्हणतात. तर, गौरी पूजनासाठी नेमकं कोणते साहित्य लागतात ते जाणून घेऊयात. 

गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य

गौरी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये तांब्या, फुलपात्र, ताम्हण, पूजेचं ताट, कर्पूरपात्र, घंटा, पळी. पूजेच्या साहित्यात तांब्याची आणि चांदीची भांडी वापरावीत. 

पूजेसाठी लागणारे साहित्य

हळद, कुंकू, गंध, अक्षता, गुलाल, अबीर, सुपाऱ्या , विड्याची पाने, नारळ, गूळ, खोबरं, खारिक, बदाम, पाच प्रकारची फळं, सुगंधी तेल, पंचामृतासाठी दूध, दही, तूप मध, साखर, तांदूळ, गहू, नाणी यांसारखे साहित्य लागेल. 

फुले

नागचाफा, केवडा, कण्हेर, बकुळ, भेंडी, कमळ, शेवंती, जाई, जुई, मोगरा, अशोक, पारिजात, जास्वंद, सोनचाफा.

पत्री

बेल, आघाडा, मालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोरी, रुई, तुळस, डाळींब, धोत्रा, बकुळ, अशोक

अलंकार

मणिमंगळसूत्र, बांगड्या, साडी, हिरवी चोळी, खण.

गौरी पूजन करताना सर्व साहित्याची तयारी आधीच करून ठेवा, म्हणजे आयत्यावेळी धावपळ होणार नाही. गौरी भोजनाच्यावेळी सवाष्ण महिलेला जेवणासाठी बोलाविले जाते त्याची सोय देखील आधीच करावी. गौरी पूजनासाठी खास नैवेद्य असतो, त्यात सोळा भाज्या केल्या जातात, त्याची तयारी आधीच करून ठेवा. गौरीचे आवाहन करण्याच्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धती आहेत. काहीजणी सोने, चांदी, पितळ किंवा मातीच्या मुखवट्यावर, तर काहीजणी सुघट (मातीचे भांडे) घेवून, किंवा वाहत्या पाण्याच्या खड्यांवर गौरीचे आवाहन करतात. काहीजणांच्या घरी उभ्या गौरी असतात त्यांना शालू नेसवून, दागिने घालून त्यांची पूजा केली जाते. कुळाचाराने गौरीपूजनाची जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार गौरी पूजन केलं जातं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Gauri Pujan 2024 : आज गौरी पूजनाचा दिवस; गौराई पूजनाची कथा आणि पद्धत नेमकी काय? जाणून घ्या सविस्तर

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 October 2026 : आज गुरुवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली; दत्तगुरुंच्या कृपेने समोर आलेलं संकट टळेल, करिअरला मिळणार नवी दिशा? आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली; दत्तगुरुंच्या कृपेने समोर आलेलं संकट टळेल, करिअरला मिळणार नवी दिशा? आजचे राशीभविष्य
Budh Vakri 2026: दिवाळीपूर्वीच 3 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! 24 ऑक्टोबरपासून बुध होणार वक्री, नोकरी, पैसा, प्रगतीच्या संधी, ज्योतिषशास्त्र...
दिवाळीपूर्वीच 3 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! 24 ऑक्टोबरपासून बुध होणार वक्री, नोकरी, पैसा, प्रगतीच्या संधी, ज्योतिषशास्त्र...
Kojagiri Purnima 2026: यंदा कोजागिरी पौर्णिमा 25 की 26 ऑक्टोबर? योग्य तारीख, चंद्रप्रकाशात दूध ठेवण्याची वेळ, लक्ष्मी पूजेची पद्धत, महत्त्व...
यंदा कोजागिरी पौर्णिमा 25 की 26 ऑक्टोबर? योग्य तारीख, चंद्रप्रकाशात दूध ठेवण्याची वेळ, लक्ष्मी पूजेची पद्धत, महत्त्व...
Horoscope Today 22 October 2026: आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget