Gauri Pujan 2024 : आज गौरी पूजनाचा दिवस; गौराई पूजनाची कथा आणि पद्धत नेमकी काय? जाणून घ्या सविस्तर
Gauri Pujan 2024 : गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.
Gauri Pujan 2024 : राज्यभरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. त्यानुसार आज गौराई पूजनाचा (Gauri Pujan) दिवस आहे. मंगळवारी 10 सप्टेंबरला गौरा आवाहनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज 11 सप्टेंबरला गौरी पूजन केलं जातं. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन केलं जातं. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी (Gauri) हे व्रत करतात. गौरी पूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असंही म्हणतात. गौरी किंवा महालक्ष्मीचं पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केलं जातं, म्हणूनच याला ज्येष्ठागौरी असंही म्हटलं जातं.
ज्येष्ठा गौरीचं व्रत
गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरीपूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असंही म्हणतात. गौराईचं पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केलं जातं, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असंही म्हणतात.
गौरीचे मुखावटे
विदर्भ, मराठवाड्यासह काही ठिकाणी महालक्ष्मींचे मुखवटे ठेवले जातात. विदर्भात खास करून गौरीला महालक्ष्मी म्हणतात. याशिवाय काही ठिकाणी तेरड्याची गौर असते. विविध भागात गौरीपूजनाच्या, मांडणीच्या पद्धतीत आधुनिकता दिसून येते. गौरीसह त्यांची मुलेही मांडतात. तर काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी असतात. म्हणजेच घरातील पाच धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे.
माहेरवाशीण गौराईसाठी पंचपक्वानांचा बेत
गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गौराईचं स्वागत केलं जातं. गौराईचं अगदी माहेरवाशीणीसारखं स्वागत केलं जातं. यंदा भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरीचं आगमन झालं आहे. माहेरवाशीण गौराईसाठी गोडाधोडाचा बेत करुन तिचा पाहुणचार केला जातो, यालाच गौरी पूजन असे म्हणतात. गौराईला महानैवेद्य दाखवितात. तिच्यासाठी खास गोडाधोडाचं जेवण केलं जातं. यामध्ये 16 भाज्या, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. नेहमीप्रमाणे महालक्ष्मीची पूजा करून चांगला नैवेद्य दाखवून तो आपण प्रसाद म्हणून घ्यायचा असतो. कोकणात अनेक ठिकाणी गौराईला तिखटाचा नैवेद्य म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. यावेळी गौराईसाठी कोंबडी-वडे असा नैवेद्य केला जातो. गौराई पूजनानंतर दुसऱ्याच दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :