एक्स्प्लोर

Garud Puran : मृतदेहाजवळ रात्रभर जागरण करण्यामागचं गूढ नेमकं काय? गरुड पुराणात सांगितलंय मोठ्ठं कारण...

Garud Puran : धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार केल्यास मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यात अडथळे येऊ शकतात. तसेच, आणखी कोणती कारणं आहेत ते जाणून घेऊयात.

Garud Puran : हिंदू धर्मात व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही नियम आणि परंपरांचे पालन केले जाते. यामध्ये सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार न करण्याची प्रथा विशेष महत्त्वाची मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार केल्यास मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यात अडथळे येऊ शकतात. तसेच, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार केल्यास स्वर्गाचे दार बंद होतात आणि नरकाचा रस्ता मोकळा होतो अशी मान्यता आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी मृतदेह एकटा सोडला जात नाही. गरुड पुराणाशी (Garud Puran) संबंधित मान्यतांमध्येही यामागील काही कारणांचा उल्लेख आढळतो.

रात्री मृतदेह एकटा का सोडला जात नाही?

गरुड पुराणातील मान्यतेनुसार, मृतदेह रात्रीच्या वेळी एकटा ठेवल्यास त्याच्याभोवती असलेल्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडू शकतो, अशी मान्यता आहे. या शक्ती मृतदेहात प्रवेश करू शकतात आणि त्याचा परिणाम घरातील वातावरणावरही होऊ शकतो, असे मानले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, रात्रीच्या वेळी तांत्रिक क्रियेचा प्रभाव देखील वाढतो. त्यामुळे मृताच्या आत्म्याला त्रास होऊ शकतो. 

मृतदेहाचे प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठीही असतात लोक

मृतदेह रात्री एकटा न सोडण्यामागे केवळ धार्मिक कारणेच नाहीत, तर काही व्यावहारिक कारणेदेखील आहेत. पूर्वी मृतदेह अनेकदा घराबाहेर किंवा मोकळ्या जागेत ठेवला जात असे. अशा वेळी कुत्रे, मांजरी किंवा इतर प्राणी मृतदेहाला इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे मृतदेहाचे संरक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ कोणीतरी असणे आवश्यक मानले जात असे.

तसेच मृत्यूनंतर काही काळाने शरीरात नैसर्गिक बदल होण्यास सुरुवात होते. यामुळे शरीरातून दुर्गंधी येऊ शकते. अशा वेळी मृतदेहाजवळ धूप किंवा अगरबत्ती लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण सुगंधित राहण्यास आणि दुर्गंधी कमी जाणवण्यास मदत होते.

मृत्यूनंतर आत्मा काही काळ शरीराभोवतीच असतो, अशी मान्यता

गरुड पुराणाशी संबंधित धार्मिक मान्यतेनुसार, व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्मा काही काळ आपल्या शरीराच्या आणि कुटुंबीयांच्या आसपास भटकत राहतो. मृत व्यक्तीला आपल्या प्रियजनांचा मोह असतो आणि ती आपल्या कुटुंबातील सदस्यांना पाहत असते, अशी धारणा आहे. 

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, मृत्यूनंतर शरीरातून आत्मा निघून जातो आणि शरीर निर्जीव होते. अशा रिकाम्या शरीरावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडू शकतो, अशी समजूत आहे. त्यामुळे मृतदेह रात्रीच्या वेळी एकटा न ठेवता त्याच्याजवळ कोणीतरी उपस्थित राहते. याच धार्मिक आणि व्यावहारिक कारणांमुळे मृतदेहाजवळ रात्रभर जागरण करण्याची परंपरा आजही अनेक ठिकाणी पाळली जाते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :      

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार पैशांची बरसात; नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Garud Puran : मृतदेहाजवळ रात्रभर जागरण करण्यामागचं गूढ नेमकं काय? गरुड पुराणात सांगितलंय मोठ्ठं कारण...
मृतदेहाजवळ रात्रभर जागरण करण्यामागचं गूढ नेमकं काय? गरुड पुराणात सांगितलंय मोठ्ठं कारण...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार पैशांची बरसात; नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार पैशांची बरसात; नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Horoscope Today 15 November 2026: आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Chatt Puja 2026: छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
Embed widget