एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीला तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय; बाप्पा होतील प्रसन्न

Ganesh Chaturthi 2024 : हिंदू धर्मामध्ये श्री गणेश आराध्यदैवत आहे. यावर्षी गणेश चतुर्थी 07 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी कोणते उपाय करुन तुम्हाला लाभ मिळेल, ते जाणून घेऊयात.

Ganesh Chaturthi 2024 : हिंदू धर्मामध्ये गणेश प्रथम पूजनीय आहेत. गणपतीला आराध्य दैवत मानलं जातं. कोणतंही शुभ कार्य करण्याआधी गणेशाची (Lord Ganesha) आराधना केली जाते. यावर्षी 07 सप्टेंबर रोजी म्हणजेच (उद्या) बाप्पाचं आगमन होणार आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला, म्हणून या चतुर्थीला 'गणेश चतुर्थी' (Ganesh Chaturthi 2024) म्हटलं जातं. यावर्षी तुम्ही गणेश चुतर्थीला तुमच्या राशीनुसर काही उपाय करुन पाहा. तुम्हाला याचा फायदा होईल. तुमच्या राशीनुसार हे उपाय केल्या बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील.

मेष रास : मेष राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या वक्रतुंड स्वरूपाची पूजा करणं फायदेशीर ठरेल. यासोबतच गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवावा.

वृषभ रास : वृषभ राशीच्या लोकांनी गणेशाच्या शक्तीविनायक रूपाची पूजा करावी. यासोबतच गणपतीला तूप आणि साखरेचा नैवेद्य दाखवणं फायदेशीर ठरेल.

मिथुन रास : मिथुन राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मी गणेशाची पूजा करावी. गणपतील मुगाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करावा आणि गरीब व्यक्तीला काळी ब्लँकेट दान करावं.

कर्क रास : कर्क राशीच्या लोकांनी वक्रतुंड स्वरूपातील गणेशाची पूजा करावी. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. हे तुमच्यासाठी शुभ राहील.

सिंह रास : या राशीच्या लोकांनी लक्ष्मी गणेशाच्या स्वरूपातील श्री गणेशाची पूजा करावी. चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला मनुकांचा नैवेद्य अर्पण करावा. तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील.

कन्या रास : कन्या राशीच्या व्यक्तींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या लक्ष्मी गणेश स्वरूपाची पूजा करावी आणि लाडक्या गणेशाला सुक्या मेव्याचा नैवेद्य दाखवावा. 

तूळ रास : तूळ राशीच्या व्यक्तींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गणपतीला पाच नारळ अर्पण करावेत.

वृश्चिक रास : वृश्चिक राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान 'श्वेतर्क गणेश' (पांढऱ्या रंगातील गणेशाची मूर्ती) स्वरुपाची पूजा करावी. बाप्पाला लाल जास्वंदाची फुले अर्पण करणं तुमच्यासाठी शुभ राहील.

धनु रास : या राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी 'ॐ गं गणपतये नम:' मंत्राचा जप करावा आणि लाडक्या बाप्पाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.

मकर रास : मकर राशीच्या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्तीविनायकाची पूजा करावी. लाडक्या गणेशाला वेलची आणि लवंगा अर्पण कराव्यात. बाप्पाच्या चरणी पिवळं फुलं अर्पण करणं देखील शुभ राहील.

कुंभ रास : कुंभ राशीच्या लोकांनी गणेशाच्या शक्तीविनायक स्वरूपाची पूजा करावी. गणेश चतुर्थी दिवशी अन्नदान करणंही तुमच्यासाठी फायदेशीर राहिल.

मीन रास : मीन राशीच्या व्यक्तींनी हरिद्र गणेशाची पूजा करावी. पूजेच्या वेळी गणेशाला मध आणि केशर अर्पण करा. यामुळे तुम्हाला लाभ मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Ganesh Chaturthi 2024 : गणेशाची स्थापना करताना 'या' दिशेला करा; जाणून घ्या वास्तू शास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा; 5 राशींना थेट धनलाभाचे संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा; 5 राशींना थेट धनलाभाचे संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रींमतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा करणार भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रींमतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा करणार भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Embed widget