एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीला तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय, बाप्पा होतील प्रसन्न

Ganesh Chaturthi Upay : हिंदू धर्मामध्ये श्री गणेश आराध्यदैवत आहे. यावर्षी गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी कोणते उपाय करुन तुम्हाला लाभ मिळेल, ते वाचा सविस्तर...

Ganesh Chaturthi : हिंदू धर्मामध्ये श्री गणेश प्रथम पूजनीय आहेत. गणपतीला आराध्य दैवत मानलं जातं. कोणतंही शुभ कार्य करण्याआधी श्री गणेशाची आराधना केली जाते. यावर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच (बुधवारी) बाप्पाचं आगमन होणार आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्री गणेशाचा जन्म झाला, म्हणून या चतुर्थीला 'श्री गणेश चतुर्थी' (Ganesh Chaturthi 2022) म्हटलं जातं. यावर्षी तुम्ही श्री गणेश चुतर्थीला तुमच्या राशीनुसर काही उपाय करुन पाहा. तुम्हाला याचा फायदा होईल. तुमच्या राशीनुसार हे उपाय केल्या बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील.

मेष : मेष राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या वक्रतुंड स्वरूपाची पूजा करणं फायदेशीर ठरेल. यासोबतच गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवावा.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी श्री गणेशाच्या शक्तीविनायक रूपाची पूजा करावी. यासोबतच गणपतीला तूप आणि साखरेचा नैवेद्य दाखवणं फायदेशीर ठरेल.

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांनी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मी गणेशाची पूजा करावी. गणपतील मुगाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करावा आणि गरीब व्यक्तीला काळी ब्लँकेट दान करावं.

कर्क : कर्क राशीच्या लोकांनी वक्रतुंड स्वरूपातील गणेशाची पूजा करावी. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. हे तुमच्यासाठी शुभ राहील.

सिंह : या राशीच्या लोकांनी लक्ष्मी गणेशाच्या स्वरूपातील श्री गणेशाची पूजा करावी. चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला मनुकांचा नैवेद्य अर्पण करावा. तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील.

कन्या : कन्या राशीच्या व्यक्तींनी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या लक्ष्मी गणेश स्वरूपाची पूजा करावी आणि लाडक्या गणेशाला सुक्या मेव्याचा नैवेद्य दाखवावा. 

तूळ : तूळ राशीच्या व्यक्तींनी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गणपतीला पाच नारळ अर्पण करावेत.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान 'श्वेतर्क गणेश' (पांढऱ्या रंगातील श्री गणेशाची मूर्ती) स्वरुपाची पूजा करावी. बाप्पाला लाल जास्वंदाची फुले अर्पण करणं तुमच्यासाठी शुभ राहील.

धनु : या राशीच्या लोकांनी  श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी 'ॐ गं गणपतये नम:' मंत्राचा जप करावा आणि लाडक्या बाप्पाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.

मकर : मकर राशीच्या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्तीविनायकाची पूजा करावी. लाडक्या गणेशाला वेलची आणि लवंगा अर्पण कराव्यात. बाप्पाच्या चरणी पिवळं फुलं अर्पण करणं देखील शुभ राहील.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी श्री गणेशाच्या शक्तीविनायक स्वरूपाची पूजा करावी. श्री गणेश चतुर्थी दिवशी अन्नदान करणंही तुमच्यासाठी फायदेशीर राहिल.

मीन : मीन राशीच्या व्यक्तींनी हरिद्र गणेशाची पूजा करावी. पूजेच्या वेळी श्री गणेशाला मध आणि केशर अर्पण करा. यामुळे तुम्हाला लाभ मिळेल.

*टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.*

 

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: धनु, मकर राशींच्या लोकांनी उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ राखा! नवा आठवडा खिशाला कात्री? साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशींच्या लोकांनी उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ राखा! नवा आठवडा खिशाला कात्री? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक राशींसाठी नवा आठवडा खर्चात टाकणारा; पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक राशींसाठी नवा आठवडा खर्चात टाकणारा; पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Vastu Tips : पाकिटात 'या' 4 गोष्टी चुकूनही ठेवू नका; अन्यथा..हातातूनही वाया जाईल पैसा
पाकिटात 'या' 4 गोष्टी चुकूनही ठेवू नका; अन्यथा..हातातूनही वाया जाईल पैसा
Numerology : वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांचं भाग्य उजळतं; चुंबकासारखा हातात येतो पैसा, रातोरात श्रीमंतीत जगतात
वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांचं भाग्य उजळतं; चुंबकासारखा हातात येतो पैसा, रातोरात श्रीमंतीत जगतात

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Embed widget