Gajkesari Yog 2026 : महाशक्तिशाली 'गजकेसरी योगा'त होणार नव्या वर्षाची सुरुवात; 'या' 3 राशींचं नवीन वर्ष सुस्साट, नोकरी, गाडी, पैसा होणार डब्बल
Gajkesari Yog 2026 : नवीन वर्षाची सुरुवात तीन राशींच्या लोकांसाठी चांगली असणार आहे. याचं कारण म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच गजकेसरी योग जुळून आला आहे.

Gajkesari Yog 2026 : नवीन वर्ष 2026 सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे येणारं नवीन वर्ष कसं असेल याबाबत सगळ्यांचीच उत्सुकता ताणून धरली आहे. नवीन वर्ष कसं जाईल याबाबत प्रत्येकालाच जाणून घेण्याची उत्सुकता असते. नव्या वर्षात प्रगतीचे मार्ग खुले होतील की समस्यांचा सामना करावा लागेल. अशा वेळी 3 राशींच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात फार चांगली असणार आहे. याचं कारण म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच गजकेसरी योग (Gajkesari Yog) जुळून आला आहे. त्यामुळे तुमच्या नशिबाचे दार खुलतील. तर, या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात फार चांगली असणार आहे. या काळात देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल. नोकरदार लोकांच्या पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये देखील चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल. या काळात परदेशात यात्रेला जाण्याचे योग जुळून येणार आहेत.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांचा पगार वाढण्याची शक्यता आहेत. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची लोक प्रशंसा करतील. ते तरुण लग्नाचे आहेत त्यांच्यासाठी चांगले प्रस्ताव येतील. एकूणच हा काळ तुमच्यासाठी फार लाभदायी ठरणार आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष शुभकारक असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच जुळून आलेल्या गजकेसरी योगामुळे तुमचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता. कामाच्या ठिकाणी तुमची पद-प्रतिष्ठा वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















