Falgun Vinayak Chaturthi 2023 : सुखकर्ता गौरीपुत्र भगवान गणेशाची महिन्यातून दोनदा चतुर्थीचे व्रत केले जाते. एक कृष्ण पक्षात तर एक शुक्ल पक्षात असते. 21 फेब्रुवारी 2023 म्हणजे आजपासून फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष सुरू झाला आहे. या पक्षात विनायक चतुर्थीचे व्रत पाळले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्यांची सर्व कामे सिद्ध होतात, असे मानले जाते. यासोबतच जीवनातील अडचणी दूर व्हाव्या, रोगांपासून मुक्ती मिळावी या इच्छेनेही हे व्रत पाळले जाते. या वर्षी फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थीची तिथी, पूजा मुहूर्त आणि उपाय जाणून घ्या.



फाल्गुन विनायक चतुर्थी 2023 तारीख, मुहूर्त जाणून घ्या


यावर्षी फाल्गुन महिन्याची विनायक चतुर्थी 23 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. या व्रताने बुद्धी आणि ज्ञान वाढते. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने जीवनातील अडचणी कमी असे म्हटले जाते. स्मरणशक्ती वाढते.



फाल्गुन विनायक चतुर्थी 2023 मुहूर्त
पंचांगानुसार, फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 23 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 3.24 वाजता सुरू होत असून ही तिथी दुसऱ्या दिवशी 24 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 1.33 वाजता समाप्त होईल. गणपती पूजेसाठी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.32 ते दुपारी 01.49 पर्यंत असेल. हा दिवस



विनायक चतुर्थी 2023 शुभ योग


फाल्गुन विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी 4 शुभ योग सर्वार्थ सिद्धी, रवि योग, शुक्ल आणि शुभ योग यांचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. पौराणिक मान्यतेनुसार शुभ हा गणपतीचा पुत्र मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, शुभ योगामध्ये काही कार्य केल्याने व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व सुधारते आणि त्याला प्रसिद्धी मिळते. अशा परिस्थितीत गणपतीची पूजा करून नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ राहील.


 


सर्वार्थ सिद्धी योग - दिवसभर
शुभ योग - 22 फेब्रुवारी 2023, रात्री 11.47 - 23 फेब्रुवारी 2023, रात्री 08.58
शुक्ल योग - 23 फेब्रुवारी 2023,रात्री 08.58 - 24 फेब्रुवारी 2023, रात्री 06.48 
रवि योग - 23 फेब्रुवारी 2023, संध्याकाळी 06.57 - 24 फेब्रुवारी 2023, 03.44 पहाटे



फाल्गुन विनायक चतुर्थीला या 3 गोष्टी करा, गणेशाची होईल कृपा!


विनायक चतुर्थी ही गणपतीकडे प्रार्थना करण्यासाठी विशेष मानली जाते. अशा स्थितीत शुभ मुहूर्तावर गणपतीची पूजा करा आणि संध्याकाळी संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण करा. असे म्हणतात की, यामुळे कामात येणारे अडथळे नष्ट होतात आणि गणपतीच्या कृपेने सर्व कामे पूर्ण होतात. 


 


या दिवशी भगवान गणेशाला 21 लाडू अर्पण करा आणि नंतर ते गरीब मुलांना दान करा. शक्य असल्यास घरातील मुलांकडून दान करून घ्या. यामुळे त्याचा बुध मजबूत होईल आणि अभ्यासात रस वाढेल.



फाल्गुन विनायक चतुर्थीला गणेशजींना सिंदूर टिळा लावा. टिळक लावताना हा मंत्र जरूर वाचावा. “सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्। शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्॥" घरामध्ये कोणी आजारी असेल तर गणपतीला सिंदूर अर्पण करून तो टिळा त्या व्यक्तीस लावावा. प्राणघातक आजारही यामुळे नष्ट होतात अशी मान्यता आहे


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Sankashti Chaturthi 2023  : संकष्टी चतुर्थीला पूर्ण होतील प्रत्येक इच्छा! 'ही' व्रत कथा वाचा, श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळवा