Sankashti Chaturthi 2023  : सध्या माघ महिना सुरू असून या महिन्याच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2023) व्रत केले जाते. यंदा या महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 9 फेब्रुवारी, गुरुवार रोजी असून आजच्या दिवशी संकष्टी चतुर्थी व्रत करण्यात येत आहे. हा दिवस भगवान गणेशाला (Lord Ganesh) समर्पित आहे आणि या दिवशी त्याची विधीपूर्वक पूजा केली जाते. श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी लोक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करतात. तुम्हीही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर उपवासाची कथा जरूर वाचा. गणेश जी सर्व संकटे दूर करतील, कारण कथेशिवाय कोणतेही व्रत अपूर्ण मानले जाते.


 


संकष्टी चतुर्थी व्रताची कथा
पौराणिक कथेनुसार, एकदा सर्व देवी-देवतांवर मोठे संकट आले. संकटावर जेव्हा उपाय सापडला नाही तेव्हा, देवता भगवान शिवाकडे मदत मागण्यासाठी गेले. जेव्हा भगवान शिवाने गणेश आणि कार्तिकेयाला संकटाचे निराकरण करण्यास सांगितले, तेव्हा दोन्ही भावांनी सांगितले की ते सहजपणे सोडवतील. हे ऐकून भगवान शिवजी कोंडीत सापडले. त्यानंतर एके दिवस भगवान शंकर पार्वतीनं आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावले. या दोघा भावंडांमध्ये स्पर्धा ठेवली. स्पर्धा अशी होती की, दोघांमधून कोण पृथ्वी प्रदक्षिणा करुन आधी परत येतं. सर्वात आधी परतणारा जिंकेल आणि श्रेष्ठ ठरेल.


 


श्रीगणेशाची चतुराई पाहून सर्वच भारावले!
विलंब न करता भगवान कार्तिकेय आपल्या वाहन मोरावर स्वार होऊन पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. तर गणेशजींकडे त्यांचे वाहन उंदराची स्वारी होती. अशा स्थितीत मोराच्या तुलनेत उंदराकडून जलद परिक्रमा करणे शक्य नव्हते. मग गणेशाने चतुराईने पृथ्वीला प्रदक्षिणा न घालता चक्क आपल्या माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या 7 परिक्रमा केल्या. जेव्हा महादेवाने गणेशजींना विचारले की, असे का केले? तेव्हा गणेशजी म्हणाले की हे सर्व जग आई-वडिलांच्या चरणी आहे.



..आणि भगवान शिव-माता पार्वती श्रीगणेशावर खूप प्रसन्न झाले
म्हणूनच तुम्हा दोघांच्या भोवती परिक्रमा मारली. हे उत्तर ऐकून भगवान शिव आणि माता पार्वती खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी देवांचे संकट दूर करण्यासाठी गणेशाची निवड केली. तसेच त्यांनी गणपतीला म्हटले, तू खरंच बुद्धीमान आहेस. आता संपूर्ण जग तुला बुद्धीदाता म्हणून ओळखेल. यासोबतच भगवान शिवाने गणेशाला आशीर्वादही दिला की, जो कोणी गणेशाची पूजा करून चतुर्थीच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करेल त्याची सर्व दुःखे दूर होतील. यासोबतच चतुर्थीचा उपवास केल्याने पापांचा नाश होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Sankashti Chaturthi 2023  : आज संकष्टी चतुर्थी! सुख, सौभाग्यासाठी श्रीगणेशाची होईल कृपा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत