Diwali Padwa 2024 : संपूर्ण भारतभर सध्या दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून या सणाकडे पाहिजे जाते. दिवाळीचा सण नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून सुरु होतो. परंतु, यातील दिवाळी पाडव्याला (Diwali Padwa 2024) खास महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून दिवाळी पाडव्याची ओळख आहे. या दिवशी अनेक वस्तूंची खरेदी करण्याची पद्धत आहे.


दर वर्षी लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो. यंदा 2 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आहे. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला पाडवा साजरा करतात, या दिवसाला बालिप्रतिपदा असं देखील म्हणतात. यंदा पाडव्याचा शुभ मुहूर्त नेमका कोणता? नवऱ्याच्या औक्षणासाठी शुभ वेळ कोणती? जाणून घेऊया.


पाडवा शुभ मुहूर्त (Diwali Padwa 2024 Shubh Muhurat)


पाडव्याच्या दिवशी अनेक व्यावसायिक, तसेच व्यापारी वही पूजन करतात. अनेक जण नवीन वस्तू खरेदी करतात, त्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 8 वाजून 6 मिनिटांपासून ते सकाळी 9 वाजून 31 मिनिटांपर्यंत आहे. दुसरा शुभ अमृत मुहूर्त दुपारी 3 वाजून 12 मिनिटांपासून ते 4 वाजून 36 मिनिटांपर्यंत असा हा लाभ मुहूर्त असणार आहे.


पतीला ओवाळण्यासाठी मुहूर्त कोणता? (Diwali Padwa 2024 Aukshan Muhurat)


दिवाळी पाडव्यादिवशी पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी त्याचं औक्षण करते, त्याला ओवाळते. यंदा पतीला ओवाळण्यासाठी संध्याकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत मुहूर्त असणार आहे.


Diwali Padwa 2024 Wishes : दिवाळी पाडव्यानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या हार्दिक शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश


दिवाळी पाडव्याला पत्नी आपल्या पतीला का ओवाळते? (Diwali Padwa Importance)


भगवान विष्णूंनी बळी राजाचं गर्वहरण केलं, शिवाय त्याच्या दातृत्त्वाचा मान ठेवून त्याचा लौकिक वाढवला, ते पाहून लक्ष्मी माता प्रसन्न झाली. तिने आपल्या पतीचे अर्थात भगवान विष्णूंचे औक्षण करून स्वागत केले, तेव्हा विष्णूंनी तिला ओवाळणी म्हणून ऐश्वर्य प्राप्तीचा आशीर्वाद दिला. विष्णु-लक्ष्मीच्या जोडीने एकमेकांचा जो आदर सन्मान केला तसा प्रत्येक पती पत्नीने एकमेकांचा करावा, या उद्देशाने पाडव्याला नवऱ्याला ओवाळण्याची आणि नवऱ्याने एखादी भेटवस्तू देण्याची प्रथा पडली.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : यंदाचा दिवाळी पाडवा 3 राशींसाठी ठरणार खास; 2 नोव्हेंबरपासून नशीब लखलखणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले


Diwali Padwa 2024 Gifts : दिवाळी पाडव्याला लाडक्या बायकोला द्या 'या' खास भेटवस्तू; पाहा राशीनुसार बेस्ट ऑप्शन्स