Diwali Padwa 2024 Wishes : दिवाळीला (Diwali 2024) प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे. यामध्येच नवीन दाम्पत्यासाठी सर्वात मुख्य आकर्षण असतं ते दिवाळी पाडव्याचं (Diwali Padwa). दिवाळी पाडव्याचा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक अर्थात अर्धा मुहूर्त असं या दिवसाचं वर्णन करतात. यावर्षी आज दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतात. या निमित्ताने तुम्हाला देखील तुमच्या परिवाराला तसेच जोडीदाराला खास शुभेच्छा द्यायच्या असतील तर या ठिकाणी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश पाठवले आहेत.  


दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 2024 (Diwali Padwa 2024 Wishes)


1. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, 
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, 
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!



2. आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा


दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!


 


3. धनाची पूजा,
यशाचा प्रकाश,
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!



4. सगळा आनंद, सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता, सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे 
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!



5. धनाचा होवो वर्षाव 
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव 
मिळो नेहमी समृद्धी अशी 
होवो खास तुमची आमची दिवाळी 
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!



6. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुनि निघो ही निशा
घेऊनि येवो नवी भेद नवी आशा
दिवाळी पाडवा आणि बालिप्रतिपदा निमित्त हार्दिक शुभेच्छा!


 


7. वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती 
पण तुझी साथ कधी न सुटती, हीच इच्छा कायमस्वरूपी मनी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!



8. पाडव्याच्या या मंगल प्रसंगी 
तुमचे जीवन आनंद, यश आणि समृद्धीनं भरलेलं राहो, 
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!



9. पणतीचा उजेड अंगणभर राहू दे, 
लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे, 
माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर, 
तुझा सहवास जन्मभर राहू दे, 
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!



10. साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे,
उत्तम दिनाचे महात्म्य आहे,
सुखद ठरो हा दिवाळी पाडवा, 
त्यात असूदे अवीट गोडवा
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :                                       


Astrology : आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 4 राशींना डबल लाभ, पाडव्याचा दिवस ठरणार खास