Diwali Padwa 2024 Lucky Zodiacs : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला दिवाळी पाडवा साजरा केला जातो. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानण्यात आला आहे. नवरा-बायकोसाठी हा दिवस अत्यंत खास मानला जातो. या दिवसाला बलिप्रतिपदा, गोवर्धन पूजा असं देखील म्हटलं जातं.

Continues below advertisement

यंदा पाडवा 2 नोव्हेंबरला आला आहे. या काळात ग्रहांच्या मोठ्या हालचाली होत आहेत, ज्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोगासह दुर्मिळ शुभ योग घडत आहेत. काही राशीच्या लोकांना या शुभ योगांचा विशेष फायदा होईल. या राशीच्या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा राहील, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

दिवाळीत बनत असलेले राजयोग, शुभ योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात सूर्य देखील विशाखा नक्षत्रात प्रवेश करत आहे, त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अधिक लक्ष केंद्रित कराल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. तसेच या काळात तुम्ही मोठ्या लोकांशी संबंध वाढवू शकता. त्याचबरोबर भागीदारीच्या कामात तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. तुम्हाला आदर मिळू शकेल.

Continues below advertisement

सिंह रास (Leo)

2 नोव्हेंबरपासूनचा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण सूर्य देव तुमच्या राशीतून तिसऱ्या घरात प्रवेश करत आहे. त्यामुळे या काळात तुमचं धैर्य वाढेल. तसेच, हा काळ पैसा आणि व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगला जाणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल आणि तुमचा हा नवीन प्रयोग तुम्हाला चांगला नफाही मिळवून देईल. यावेळी, ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना चांगला नफा मिळू शकतो. तसेच यावेळी भाऊ-बहिणींचं सहकार्य मिळेल. अचानक धनलाभाचे संकेत संभवतात.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरेल. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात मोठं यश मिळू शकतं. तसेच, नोकरदार लोक देखील या काळात प्रगती करतील आणि ते त्यांचं ध्येय सहज साध्य करतील. तुमच्या आयुष्यात बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतील. त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरीत पगारवाढीची देखील शक्यता आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : 7 नोव्हेंबरपासून 3 राशींना सोन्याचे दिवस; गुरु-शुक्र करणार कमाल, अनपेक्षित स्रोतांतून होणार अपार धनलाभ