Diwali 2024 : आनंदाचा, उत्साहाचा आणि दिव्यांचा असा दिवाळीचा (Diwali 2024) सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीचा सण हा पाच ते सहा दिवसांचा असतो. याची सुरुवात धनत्रयोदशीपासून सुरु होते. त्यानुसार, यंदा 29 ऑक्टोबरपासून दिवाळीची सुरुवात होतेय. दिवाळीच्या दिवशी लोक आपल्या घराची सजावट करतात. घराला आकाशकंदील आणि दिव्यांनी सजवतात. तसेच, या दिवशी लोक नवीन कपडे परिधान करतात. 

असं म्हणतात की, दिवाळीत राशीनुसार त्या-त्या रंगाचे कपडे परिधान करणाऱ्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. याशिवाय, यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. त्यामुळे दिवाळीत राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत हे जाणून घेऊयात. 

मेष रास 

मेष राशीच्या महिलांनी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनासाठी लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. 

वृषभ रास 

वृषभ राशीच्या लोकांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. यामुळे धनलाभ आणि समृद्धीचे योग जुळून येतात. 

मिथुन रास 

मिथुन राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी नारिंगी रंगाचे कपडे परिधान करणं फार शुभ मानलं जातं. धनसंपत्तीला आकर्षित करण्यासाठी हा रंग शुभ आहे. 

कर्क रास 

कर्क राशीच्या लोकांनी दिवाळी पूजनाच्या वेळी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत. कर्क राशीला हिरवा रंग फार शुभ असतो. 

सिंह रास 

सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणं फार शुभ ठरेल. 

कन्या रास 

दिवाळीला आर्थिक लाभासाठी कन्या राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. 

तूळ रास 

तूळ राशीच्या लोकांनी धनहानीपासून वाचण्यासाठी निळ्या रंगाचे किंवा गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत. 

वृश्चिक रास 

वृश्चिक राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन करण्यासाठी मरुन रंगाचे कपडे परिधान करावेत. हा रंग तुमच्यासाठी फार शुभ ठरेल. 

धनु रास 

या राशीच्या लोकांनी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभ ठरेल. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. 

मकर रास 

देवी लक्ष्मीची कृपा हवी असल्यास निळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. 

कुंभ रास 

कुंभ राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी ग्रे रंगाचे कपडे परिधान करावेत. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहते. 

मीन रास 

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत. यामुळे तुमच्या जीवनात आनंद राहली. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Guru Pushya Nakshatra 2024 : दिवाळीआधी जुळून आला 'गुरु पुष्य नक्षत्र' योग; सोनं, घर, गाडी खरेदीसाठी शुभ मुहूर्त नेमका कोणता?