Guru Pushya Nakshatra 2024 : हिंदू धर्मग्रंथांनुसार, कोणतेही शुभ कार्य जसे की, गृह प्रवेश, मुंज, नवीन व्यवसायाची सुरुवात, गुंतवणूक, सोनं खरेदी, संपत्ती किंवा एखादी विशेष योजना सुरु करण्यासाठी पुष्य नक्षत्र योग फार शुभ मानला जातो. पुष्य नक्षत्र योग प्रत्येक महिन्याला येतो. मात्र, गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्राचा जो संयोग जुळून आला आहे त्याला गुरु पुष्य नक्षत्र म्हणतात. यासाठीच दिवाळीच्या आधी गुरु पुष्य नक्षत्र (Guru Pushya Nakshatra) योग कधी आहे ते जाणून घेऊयात. 


गुरु पुष्य नक्षत्र योग कधी आहे?


धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आधी गुरु पुष्य नक्षत्र 24 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी अहोई अष्टमीचा उपवास देखील असणार आहे. गुरु पुष्य नक्षत्रात खरेदी केलेल्या वस्तू दीर्घ काळापर्यंत उपयोगी ठरतात. 


2024 चा शेवटचा गुरु पुष्य नक्षत्र मुहूर्त 


यावर्षीचा शेवटचा गुरु पुष्य नक्षत्र योग 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 06 वाजून 15 मिनिटांनी सुरु होणार आहे तर 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 07 वाजून 40 मिनिटांनी हा शुभ मुहूर्त संपेल. त्यामुळे 24 ऑक्टोबरचा दिवस खरेदीसाठी शुभ आहे. सोनं आणि वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त - सकाळी 11.43 पासून दुपारी 12.28 पर्यंत असणार आहे. 


गुरु पुष्य नक्षत्राचं महत्त्व 


गुरु ग्रह आणि पुष्य नक्षत्र, धन-समृद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे या दोघांच्या संयोगातून जुळून येणारा योग फार शुभ असतो. यावर देवी लक्ष्मी, शनी देव आणि बृहस्पतीची कृपा असते. यामुळे या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. 


पुष्य नक्षत्रात कोणत्या वस्तूंची खरेदी करावी? 



  • गुरु नक्षत्राचा देवता बृहस्पती आहे. त्यामुळे या योगात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. यामुळे लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. 

  • पुष्य नक्षत्रावर शनीचा प्रभाव असल्यामुळे लोखंड देखील महत्त्वाचं मानण्यात आलं आहे. 

  • चंद्राच्या प्रभावाने चांदी खरेदी करु शकता. 

  • गुरु पुष्य नक्षत्रात जमीन, घर, वाहन खरेदी करणं शुभ मानलं जातं. 

  • या दिवशी दुकानात दक्षिणावर्ती शंखाची स्थापना केल्याने धनसंपत्तीत वाढ होते. त्यामुळे दिवाळीत तुम्ही या वस्तू खरेदी करु शकता. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Mangal Gochar 2024 : मंगळ-शनीचा महाअशुभ षडाष्टक योग 'या' 4 राशींसाठी ठरणार लकी; एका झटक्यात सर्व समस्या होतील दूर