Diwali 2024 : दिवाळी हा हिंदू धर्मातला असा एक महत्त्वाचा सण आहे जो संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. लोक अगदी आनंदात आणि उत्साहात दिवाळी (Diwali 2024) साजरी करतात. या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची आणि गणपतीची विधीवत पूजा करण्याची परंपरा आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केल्याने पुण्य फळ मिळतं. मात्र, या दिवशी विधीवत पूजा करण्याबरोबरच काही नियमांचं पालन करणं फार गरजेचं आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवशी काय करणं गरजेचं आहे आणि काय करु नये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
दिवाळीच्या दिवशी काय करावं?
- दिवाळीच्या आधीच संपूर्ण घराची साफसफाई करावी. घरासमोर दिवा लावावा, रांगोळी काढावी. घर फुलांनी सजवावं. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरात सुख-शांती नांदते.
- लक्ष्मी देवी आणि गणपतीची विधीवत पूजा करावी. शुभ मुहूर्त पाहून पूजा करावी. यामुळे घरात वातावरण आनंदी राहते.
- दिवाळीच्या दिवशी आपल्या कुटुंबियांना, मित्र-परिवाराला तसेच नातेवाईकांना मिठाई देणं फार शुभ मानलं जातं. यामुळे प्रेम वाढतं.
- दिवाळीला दान करण्याचं देखील विशेष महत्त्व आहे.
- दिवाळीत अंधाराला दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी दिवे लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.
- दिवाळी ही एका नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी सकारात्मक विचार करा आणि वाईट सवयी सोडून द्या.
दिवाळीच्या दिवशी काय करु नये?
- दिवाळीला साफसफाईचं विशेष महत्त्व आहे. देवी लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी घर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. घरात जर अस्वच्छता असेल तर लक्ष्मी नाराज होते.
- या दिवशी खरं बोलणं आणि मनापासून काम करणं शुभ मानलं जातं. खोटं बोलणं, धोका देणं किंवा वाईट काम करण्यापासून दूर राहा.
- दिवाळीचा दिवस हा प्रेम आणि एकतेचं प्रतीक मानला जातो. या दिवशी कोणाशीही वाईट व्यवहार करु नका.
- दिवाळीच्या दिवशी दिवा अचानक विझला तर ते अशुभ मानलं जातं. त्यामुळे दिवा तेवत राहील याची काळजी घ्या.
- दिवाळीच्या दिवशी कर्ज घेणं किंवा उधारी घेणं अशुभ मालं जातं. यामुळे आर्थिक नुकसान होतं.
- पूजेच्या वेळी शुद्ध आणि पवित्र सामग्रीचा वापर करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: