Dhanteras 2026 : 6 की 7 नोव्हेंबर? धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त नेमका कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि वस्तू खरेदीचा शुभ मुहूर्त
Dhanteras 2026 : मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्यास घर सुख-समृद्धी येते. या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा करतात.

Dhanteras 2026 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, नवरात्रीनंतर (Shardiya Navratri 2026) वेध लागतात ते दिवाळीचे (Diwali 2026). पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात धनत्रयोदशीने (Dhanteras) होते. या दिवशी लोक सोनं, चांदी, तसेच नवीन वस्तूंची खरेदी करतात. मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्यास घर सुख-समृद्धी येते. या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा करतात.
जर तुम्ही सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी शुभ मुहूर्त जाणून घेणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊयात 2026 मध्ये धनत्रयोदशी नेमकी कधी आहे आणि पूजा तसेच खरेदीचा शुभ मुहूर्त काय आहे.
धनत्रयोदशी नेमकी कधी?
द्रिक पंचांगानुसार, धनत्रयोदशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. त्यानुसार, यंदा 6 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी धनत्रयोदशीला सुरुवात होणार आहे. तर, 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल. मात्र, उदय तिथीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे.
धनत्रयोदशीला खरेदीचा शुभ मुहूर्त
द्रिक पंचांगानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी वस्तू खरेदीचा शुभ मुहूर्त 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार, वस्तू खरेदी करु शकता.
धनत्रयोदशी पूजेचा शुभ मुहूर्त
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, या दिवशी विधीवत पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. पंचांगानुसार, 6 नोव्हेंबर रोजी सध्याकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी सुरु होऊन ते रात्री 8 वाजून 10 मिनीटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :



















