Dhanteras 2024 Wishes : हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळीची (Diwali 2024) सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या या पाच दिवसांचं हिंदू धर्मात मोठं महत्त्व आहे. त्यानुसार, उद्या धनत्रयोदशीचा (Dhanteras 2024) दिवस जगभराता साजरा करण्यात येणार आहे. आता सण म्हटला की, आपल्या प्रिय व्यक्तीला, नातेवाईकांना, मित्र-परिवाराला शुभेच्छा (Wishes) देणं आलंच. आज व्हॉट्सअप मेसेज, कोट्स आणि मिम्सच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. त्यानुसार, तुम्हाला देखील यंदाच्या दिवाळीला आणि धनत्रयोदशीला आपल्या प्रियजनांना काही शुभेच्छा द्यायच्या असतील तर काही शुभेच्छा संदेश या ठिकाणी पाठवल्या आहेत. 


धनत्रयोदशीच्या शुभेच्छा 2024 (Dhanteras Wishes 2024) :


1. धन धान्याची व्हावी घरीदारी रास 
राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!


2. धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची
आणि भरभराटीची जावो
आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!


3. आला आला दिवाळीचा सण


घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण


दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी


धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी


धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!


4. धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,
कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरे करू
आली रे आली दिवाळी आली
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!


 


5. आनंदाचा प्रकाश तुमचे जीवन उजळून टाको 
आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने समृद्धी आणि यश मिळो. 
धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा...!



6. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


7. दिवाळी आली सोनपावली, 
उधळण झाली सौख्याची, 
धनधान्यांच्या भरल्या राशी
घरी नांदू दे सुख समृद्धी…
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा...!


8. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा
घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा...!


 


9. धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी
कंदील, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी
फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!


10. धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची
करोनी औचित्य दिपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची...
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:              


Shani Gochar 2024 : नाताळपर्यंत या 5 राशींची दिवाळी; 25 डिसेंबरपर्यंत जगतील राजासारखं आयुष्य, हाती येणार पैसाच पैसा