Amit Mishra on Shubhman Gill Captaincy: पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताच्या युवा संघाने झिम्बाब्वेविरुद्ध जबरदस्त मुसंडी मारली आणि सलग चार सामने जिंकत मालिकेवर 4-1 असा कब्जा केला. रविवारी झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला. शिवम दुबे सामनावीर तर वॉशिंग्टन सुंदर मालिकावीर ठरला.


कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात या संघाने दमदार कामगिरी केली. टीम इंडियाची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाली तेव्हा शुभमन गिलला कर्णधार बनवण्यात आलं होतं. यावरुन भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अमित मिश्रा याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  अमित मिश्राने एका मुलाखतीत शुभमन गिलला कर्णधारपद देण्यावर परखड मत मांडलं. 


अमित मिश्रा काय म्हणाला?


शुभमन गिलला कर्णधारपद देण्याबाबत तुमचे मत काय?, असा सवाल अमित मिश्राला मुलाखतीत विचारण्यात आला. यावर मला वाटत नाही की त्याला कर्णधार बनवायला हवे. मी तिथे असतो तर मी त्याला कर्णधारपद दिले नसते. मी त्याला आयपीएलमध्ये पाहिले आहे, त्याला कर्णधार कसं केलं, मला माहित नाही. त्याला कर्णधारपदाची कल्पनाही नाही, असं अमित मिश्रा म्हणाला. 


कोणालाही कर्णधार बनवा असं होऊ नये-


आम्ही तुम्हाला सांगतो की शुभमन गिलने 2019-2020 दुलीप ट्रॉफीमध्ये त्यांच्या संघाचे नेतृत्व केले होते. काही सामन्यांमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करण्याव्यतिरिक्त त्याला कर्णधारपदाचा फारसा अनुभव नाही. आयपीएल 2024 मध्ये त्याला गुजरात टायटन्सचे कर्णधारपद मिळाले, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात संघ आठव्या स्थानावर राहिला. याशिवाय गिलला कुठेही कर्णधारपदाचा अनुभव नाही. यावर अमित मिश्रा यांनी परखड वक्तव्य करत फक्त एखाद्याला टीम इंडियाचा कर्णधार बनवा, असं होऊ नये असं म्हटलं आहे.


मजबुरीने कर्णधार केले-


अमित मिश्रानेही खुलासा केला की, शुभमन गिलला कदाचित मजबुरीतून आयपीएलमध्ये कर्णधार बनवण्यात आले होते. मिश्रा म्हणाला की, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सकडे गेला तेव्हा गुजरात टायटन्सकडे पर्याय नव्हता.


अमित मिश्राच्या मुलाखतीचा व्हिडीओ-






हार्दिक पांड्या आणि शुभमन यांच्यात टक्कर - 


रोहित शर्माच्या टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतल्यानंतर, आता हार्दिक पांड्याला टी-२० चा नवा कर्णधार म्हणून घोषित केले जाऊ शकते. ऋषभ पंतही कर्णधारपदाच्या दावेदारांमध्ये आहे. यातच आता, झिम्बाब्वे दौऱ्यानंतर संघ व्यवस्थापन गिलच्या नावाचाही विचार करू शकते. शुभमन गिल सध्या आयपीएलमध्येही नेतृत्व करत आहे. गेल्या वर्षी हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडल्यानंतर गुजरात टायटन्सने शुभमन गिलकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.


संबंधित बातम्या:


अंबानींच्या लग्नात हार्दिक पांड्याची हवा...; अभिनेत्री अनन्यासोबत थिरकला, सर्वांत जास्त चर्चेत असणारा Video


हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'