Chandra Grahan 2024 : यंदा 2024 या वर्षात एकूण 4 ग्रहण लागणार आहेत. यामध्ये 2 ग्रहण लागले आहेत तर 2 ग्रहण लागायचे बाकी आहेत. चंद्रग्रहणाच्या (Chandra Grahan) बाबतीत बोलायचं झाल्यास, पहिलं चंद्र ग्रहण 25 मार्च 2024 रोजी लागलं आहे. तर दुसरं चंद्र ग्रहण 18 सप्टेंबर 2024 रोजी लागणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2024 रोजी वर्षातील शेवटचं सूर्य ग्रहण लागणार आहे.
खगोल विज्ञानानुसार, जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर तर पडतोच पण चंद्रावर नाही पडत. याच घटनेला चंद्र ग्रहण म्हणतात.
वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण केव्हा दिसणार?
वर्षातील दुसरं चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार, चंद्रग्रहण सकाळी 06 वाजून 12 मिनिटांनी सुरु होणार आहे. हे चंद्रग्रहण सकाळी 10 वाजून 17 मिनिटांनी समाप्त होणार आहे. या ग्रहणाची एकूण वेळ 4 तास 29 मिनिटांपर्यंत असणार आहे.
भारतात सूतक काळाची वेळ
वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण हे भारात दिसणार नाही. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा सूतक काळ देखील ग्राह्य धरला जाणार नाही. हे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे.
या देशात दिसणार शेवटचं चंद्रग्रहण
18 सप्टेंबर रोजी होणारं चंद्रग्रहण हे युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत, अटलांटिक महासागर, हिंद महासागर, अंटार्टिकासह इतर क्षेत्रफळांत दिसणार आहे.
चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' गोष्टींची काळजी घ्या
हिंदू धर्मात तसेच ज्योतिषीय वैदिक शास्त्रात सूर्य किंवा चंद्राच्या ग्रहणाला शुभ मानलं जात नाही. कारण ग्रहांच्या दरम्यान नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. तसेच, ग्रहांचा दुष्प्रभाव नसेल तर त्यासाठी ग्रहांच्या दरम्यान काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
- चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात.
- ग्रहण काळाच्या दरम्यान भोजन ग्रहण करु नये. त्याचबरोबर ग्रहणाच्या आधीच भोजन-पाणी, दुधात तुळशीची पानं टाका.
- तसेच, ग्रहणाच्या सूतक काळात नकारात्मक विचार करु नका. तर, या काळात देवाची आराधना करा.
- ग्रहण काळात देवाच्या मूर्तीला स्पर्श करु नका. तसेच, कोणत्याही प्रकारचा पूजा पाठ करु नका. तर, ग्रहणाच्या आधीच मंदिराचे दरवाजे बंद करा.
- ग्रहणाच्या दरम्यान नखं कापणे, केस कापण्यासारखी कामे करु नका. तसेच, धारदार वस्तूंचा वापर देखील करु नये.
- गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नये. यामुळे बाळाचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: