Uddhav Thackrey: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. काल(शनिवारी) संध्याकाळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांचा ठाण्यात मेळावा पार पाडला. या मेळाव्यात मोठा राडा झाल्याचं दिसून आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकले. त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या घटनेनंतर राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहेत.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या गाडीच्या ताफ्यावर नारळ फेकण्यात आल्याची घटना मुंबई ठाणे इथं घडली. मात्र त्याचे संतप्त पडसाद रात्री उशिरा कोल्हापूर शहरात उमटले आहेत.कोल्हापुरातील संतप्त शिवसैनिकांनी शहरातील मनसेचे शाखा फलकांची तोडफोड केली आहे. त्यामुळं संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.काल रात्री मुंबई ठाणे इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या गाडीच्या ताफ्यावर काही मनसे कार्यकर्त्यांनी नारळ फेकल्याची घटना समोर आली. याचे पडसद राज्याच्या अनेक भागात उमटल्याचे दिसून येत आहे. यामुळं यापुढच्या काळात कोल्हापूर शहरातील मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील वाद उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.


नेमकं काय घडलं?


काल (शनिवारी) 10 ऑगस्ट रोजी शिवसेना (ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात सभा पार पडली. या सभेपूर्वी ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांचा ताफा समोर येताच गाडीवर बांगड्या आणि नारळ फेकले. दोन्ही बाजूला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आल्याचं दिसून आलं. यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील एकमेकांमध्ये भिडल्याचं दिसून आलं. ठाण्यात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याचे पडसाद आता राज्यत्ररात उमटताना दिसत आहेत.