Astrology News : हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण (Shravan) महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज 11 ऑगस्टचा दिवस आहे. आज शुक्र नक्षत्र परिवर्तन करणार आहे. ज्योतिष शास्त्रात, शुक्र ग्रहाला भौतिक सुख, वैवाहिक सुख, श्रीमंती, कला, प्रतिभा, सौंदर्य याचा कारक आहे. शुक्र वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे. तसेच, या राशीची मीन उच्च राशीत आहे. तसेच,
ज्योतिष शास्त्रानुसार, नक्षत्र परिवर्तन फार महत्त्वपूर्ण मानण्यात आलं आहे. नक्षत्र परिवर्तनाने सर्व राशींवर शुभ-अशुभ परिणाम होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शुक्र ग्रहाचं परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. तसेच, या काळात तुम्हाला चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक बाजू चांगली आणि मजबूत असण्याची शक्यता आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद असेल. सुख-शांती टिकून राहील. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. जर तुम्हाला नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तसेच, नवीन घर, वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर हा तुमच्यासाठी चांगला मुहूर्त ठरू शकतो. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असणार आहे. तुमची आर्थिक बाजू फार चांगली असणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. तसेच, धनलाभाचेही चांगले संकेत आहेत. तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुमच्या कुटुंबीयांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तरुणांसाठी विवाहाचे योग जुळून येणार आहेत.
कन्या रास (Virgo Horoscope)
या काळात नोकरी, व्यवसायिकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जमीनीच्या संदर्भातील तुमचे जुने वाद लवकरच नष्ट होतील. तसेच, नवीन वाहन आणि प्रॉपर्टी देखील विकत घेऊ शकता. व्यवसायिकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. नवीन ऑफर्सदेखील मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: